राज्यात दिवसभरात ३,९४० करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ७४ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर ३,११९ करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने आणि आरोग्य मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, “राज्यात आज ३,९४० करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ३,११९ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १७,८१,८४१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६१,०९५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.१४ टक्के झाले आहे.

दरम्यान, राज्यात दिवसभरात ७४ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे करोनाचा मृत्यूदर २.५७ टक्के झाला आहे. आजपर्यंत १,२०,५९,२३५ नमुन्यांपैकी १८,९२,७०७ (१५.७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच सध्या ५,००,३६० रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. तर ४,०२० लोक इन्स्टिट्युशनर क्वारंटाइन आहेत.