News Flash

औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्या ११ हजार ४२० वर

आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे ४०० जणांचा मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या देखील दररोज वाढताना दिसत आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये १० ते १८ जुलै दरम्यान कडकडीत लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र तरी देखील जिल्ह्यात दररोज नवीन करोनाबाधित रुग्ण आढळतच आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येने आता ११ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात १७९ नवे करोना पॉझिटिव्ह आढळल्याने, जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ११ हजार ४२० वर पोहचली आहे. यापैकी आतापर्यंत ६ हजार ३०० जणांनी करोनावर मात केली असून, सद्यस्थितीस ४ हजार ७२० जणांवर उपचार सुरू आहेत. आजतागायत औरंगाबाद जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ४०० वर पोहचली आहे.

आज सकाळी आढळलेल्या १७९ करोनाबाधितांमध्ये औरंगाबाद शहरातील १२३ तर ग्रामीण भागातील ४६ रुग्णांचा समावेश आहे. तर, सिटी इंट्री पॉईंटवर दहा रुग्ण आढळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 4:06 pm

Web Title: the number of corona patients in aurangabad district is 11 thousand 420 msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चंद्रपूर : ‘मनपा करोना नियंत्रण कक्ष’ सतत कार्यरत
2 दूध दर आंदोलन: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेनं ठेवलं दुधात, व्हिडीओ केला पोस्ट
3 दूध दर आंदोलनाला सुरुवात, स्वाभिमानीने फोडला दुधाचा टँकर; हजारो लिटर दूध सोडलं रस्त्यावर
Just Now!
X