राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर करोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. औरंगाबादमध्ये १० ते १८ जुलै दरम्यान पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र तरी देखील येथे दररोज करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

आणखी वाचा- गडचिरोली : ‘एसआरपीएफ’च्या २९ जवानांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

आज सकाळी जिल्ह्यात ६८ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने, जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८ हजार ८२२ वर पोहचली. जिल्ह्यातील परीक्षण करण्यात आलेल्या १ हजार ३२ स्वॅबपैकी ६८ रुग्णांचे रिपोर्ट आज सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात ५ हजार २२९ जणांन करोनावर मात केलेली आहे. तर ३५८ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. सध्या ३ हजार २९५ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. शहरात लागू करण्यात आलेल्या दहा दिवसाच्या टाळेबंदीच्या काळात ५० हजार ‘अँटिजेन’ चाचण्या करण्याचे ठरविण्यात आलेले आहे.

आणखी वाचा- दिलासादायक बातमी… चंद्रपूर जिल्ह्यात १०० बाधित करोनातून बरे

या आढळलेल्या रुग्णांमध्ये औरंगाबाद शहर हद्दीतील १७ तर ग्रामीण हद्दीतील ५१ रुग्णांचा समावेश आहे. सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.