08 March 2021

News Flash

रायगड जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या आठ हजारांवर

जिल्ह्यात ३४२ करोनाचे नवीन रुग्ण

प्रतिकात्मक छायाचित्र

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ३४२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ३०५ जणांनी करोनावर मात केली आहे. चिंताजनक बाब म्हणजे सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आठ हजारावर पोहोचली. सध्या ३, २९० करोनाचे रुग्ण आहेत. तर ४, ५९६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वेगाने सुरुच आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल ३४२ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ८, १०५ वर पोहोचली आहे. २०५ जणांचे तपास अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात ३४२ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील १४६, पनवेल ग्रामिणमधील ५९, उरणमधील ३५, खालापूर १८, कर्जत ७, पेण ३३, अलिबाग २८, तळा १, रोहा १३, महाड २ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात उरण ३, खालापूर १, कर्जत १, अलिबाग १ आणि महाड १ येथे रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३०५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील २७, ८१७ जणांची करोनाचाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३, २९० करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १, ३८८, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४४१, उरणमधील १८६,  खालापूर २५३, कर्जत १०३, पेण ३१५, अलिबाग २२५,  मुरुड ४८, माणगाव ६९, तळा येथील ५, रोहा १०६, श्रीवर्धन ४५, म्हसळा ५४, महाड ३९, पोलादपूरमधील १३ करोनाबाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत २१२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ५७ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली आहे. पनवेल, उरण, पाठोपाठ, अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर आणि रोहा तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात पुन्हा एकदा टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 9:34 pm

Web Title: the number of corona victims in raigad district is over eight thousand aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक! सोलापुरात कर्जबाजारी बारचालकाची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या
2 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिलदार! फडणवीसांना सत्ता गेल्याचं सहन होईना-यशोमती ठाकूर
3 मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना
Just Now!
X