“फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही, तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर महाविकासआघाडी सरकार पडेल. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे जर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिले जात नसेल, तर काँग्रेसने महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा काढावा.” असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात, अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे सांगतानाच २०२४च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल, असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे.

या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी म्हटले आहे की, “नाना पटोले यांनी राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनण्याची आपली तयारी व इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसने महाविकासआघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला पाहिजे आणि मुख्यमंत्रीपद मिळविले पाहिजे. जर मुख्यमंत्रीपद देण्यास महाविकासआघाडी सरकार तयार नसेल, तर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काँग्रेसने काढला पाहिजे.”

..तर पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल, आम्ही स्वतंत्रच लढणार – नाना पटोले

तर, राज्यातील पक्षाचा जनाधार वाढविण्याकरिता महानगरपालिके सह सर्व निवडणुका स्वबळावर लढविणे आवश्यक असल्याचे मत प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसिम खान यांनी व्यक्त के ले. राज्यात सध्या काँग्रेस चौथ्या क्र मांकाचा पक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पहिल्या क्र मांकाचा पक्ष होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त के ला आहे.

“आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दलचं आमचं धोरण जाहीर केलं आहे. समजा आम्ही सोबत आहोत असं म्हटलं आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढणार असं सांगितलं, तर ते पाठित खंजीर खुपसल्यासारखं होईल. त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय, आम्ही स्वतंत्रच लढणार”, असं नाना पटोले म्हणालेले आहेत.