सिमेंट नाली चोरीला; बांधकाम विभागात खळबळ

रामनगर परिसरातील विदर्भ हाऊसिंग कॉलनीतील सिमेंट नाली चोरीला गेल्याच्या वृत्ताने सार्वजनिक बांधकाम विभागात चांगलाच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे बुधवारी बांधकाम विभागाला १२.५० लाखांच्या कामात नालीच्या बांधकामाचा समावेश नव्हता, असे माध्यमांना कळवावे लागले आहे. दरम्यान, बांधकाम विभागाने प्रस्तुत बांधकामाच्या ठिकाणी लावलेल्या फलकावर पेंटर बोलावून तात्काळ तीन दुरुस्त्या कराव्या लागल्या आहेत.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
way of dharavi redevelopment is cleared railway land finally transferred to DRP
धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, रेल्वेची २५.५७ एकर जमीन अखेर ‘डीआरपी’कडे हस्तांतरित
Director of Rosary School
पुणे : रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानासह दोघे अटकेत, मध्यरात्री शिवाजीनगर विशेष न्यायालयात हजर

विदर्भ हाऊसिंग कॉलनीत १२.५० लाखाच्या निधीतून सिमेंट रस्ता, पेवर्स व नाली बांधकाम करायचे होते. तसा फलक रस्ता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तिथे लावण्यात आला. फलकावर रस्ता, नाली व पेवर्स लिहिले आहेत, मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी रस्ता व पेवर्स दिसते, नाली दिसत नाही. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार तेथील जागरूक नागरिक सुनील तिवारी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात सिमेंट नाली चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. त्या आधारावर रामनगर पोलिसांनी चौकशी सुरू केली. दरम्यान, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी या संपूर्ण बांधकामाची कागदपत्रे तपासली असता १२.५० लाखांच्या निधीतून केवळ रस्ता व पेवर्सचे काम करायचे होते. तिथे नालीचे काम नव्हते. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर फलक लावताना कनिष्ठ अभियंता यांच्याकडून चूक झाली आणि त्यांनी फलकावर रस्ता व पेवर्स सोबत नालीचा उल्लेख केला. त्यामुळे हा सर्व गोंधळ झाला. एका कनिष्ठ अभियंत्याच्या चुकीमुळे हा सर्व घोळ झाला, असे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. तसेच या फलकावर बांधकाम सुरू झाल्याचे दिनांक ५ डिसेंबर २०१९ व बांधकाम पूर्ण झाल्याचा दिनांक १६ सप्टेंबर २०१९ असे लिहिले होते. मात्र आता या फलकावर तीन ठिकाणी दुरुस्ती करून काम सुरू झाल्याचा दिनांक ५ डिसेंबर २०१८ व काम पूर्ण झाल्याचा दिनांक १६ सप्टेंबर २०१९, अशी दुरुस्ती केली आहे.