News Flash

एमएचटी-सीईटीचा निकाल आज जाहीर होणार

एमएचटी-सीईटीच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.

MSBSHSE Maharashtra Board HSC result 2019 Declared

औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परिक्षेचा निकाल सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. एमएचटी-सीईटीच्या www.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. सुमारे ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यी या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. कक्षाच्यावतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षाच्यामाहितीनुसार, सीईटीचा निकाल हा ३ जून रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, आता ४ जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. २ मे २०१९ आणि १३ मे २०१९ रोजी ही परिक्षा घेण्यात आली होती. दरम्यान, सर्व पात्र उमेदवारांना त्यांचा स्कोअर, रॅंक आणि क्वलिफिकेशन स्टेटससह स्कोअरकार्ड पाहता येणार आहे. मात्र, निकाल पाहण्यासाठी जन्मतारिख, रोल नंबर ही आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना जवळ बाळगणे आवश्यक आहे.

या परिक्षेत पात्र झालेले विद्यार्थ्यी पुढे काऊन्सेलिंग सेशनसाठी पात्र असतील. त्याचबरोबर मिळालेल्या रॅंकनुसार, विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीच्या फेऱ्यांसाठी ते पात्र ठरतील त्यानंतर त्यांचा प्रवेश निश्चत होईल, असे राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 7:46 pm

Web Title: the results of the mht cet will be announced tomorrow
Next Stories
1 ‘बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्मुल्यांकनाची प्रक्रिया युध्द पातळीवर पूर्ण करणार’
2 बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थांना प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांची झेरॉक्स कॉपी देण्याचे आदेश
3 पायल रोहतागीकडून शिवरायांची बदनामी करवून घेणारा पडद्याआडचा ‘बिग बॉस’ कोण? – शालिनी ठाकरे
Just Now!
X