News Flash

कंगना रणौतप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेने दादागिरी करू नये – रामदास आठवले

शिवसेनेने आता शांतता राखावी

संग्रहीत

अभिनेत्री कंगना रणौतप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेने दादागिरी करु नये, असे आवाहन केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी दिली आहे. अभिनेत्री कंगना रणौत यांनी ‘जय महाराष्ट्र, जय मुंबई’ अशी भूमिका घेऊन आपण महाराष्ट्रभक्त असल्याचे म्हटलं असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.

आठवले म्हणाले, शिवसेनेने कंगनाबद्दल विरोधाचा अतिरेक करू नये. आता शिवसेनेने शांतता ठेवावी. कंगनाचे कार्यलय मनपाने तोडण्याची कारवाई हा अतिरेक होता. शिवसेना सत्तेत आहे, त्यांनी सरकारी दादागिरी करू नये. आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभिनेत्री कंगना रणौत यांचे आगमन होत असताना तिच्या संरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एल्गार केला, अशी माहिती आठवले यांनी दिली.

“मुंबईच्या विषयावर कंगना रणौतने सुरुवातीला पीओकेची उपमा देण्याच्या भूमिकेचे आम्ही समर्थन करीत नाही. त्यानंतर कंगनाने ‘जय मुंबई, जय महाराष्ट्र’ची भूमिका घेऊन त्याबद्दल माफी मागितली असल्यासारखे आहे. त्यामुळे शिवसेनेने आता शांत व्हावे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे महिलांचा सन्मान करणारे नेते होते. शिवसेनेने आता अभिनेत्री महिला असणाऱ्या कंगनाबाबतचा अतिरेक थांबवावा. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधणार आहे. कंगणाच्या रक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन विषय थांबवावा असे मी त्यांना सुचविणार आहे. आज शिवसेनेची सत्ता असणाऱ्या मुंबई मनपाने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करणे म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करण्यासारखं आहे. हा बदला घेण्याचा प्रकार आहे. शिवसेनेनं हा अतिरेक थांबवला पाहिजे. मी लवकरच कंगना रणौतला भेटणार आहे. ज्या मुंबई मनपा अधिकाऱ्यांनी कंगनाचे कार्यालय तोडले त्या अधिकाऱ्यांविरुद्ध कंगनाने कोर्टात जाण्याचा मी सल्ला देणार आहे,” असेही आठवले यांनी म्हटले आहे.

कोणत्याही महिलेबद्दल ‘हरामखोर’ वगैरे शब्द वापरणे चूक आहे. तोंड फोडायचेच असेल तर चीन आणि पकिस्तानचे फोडा असे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले. शरद पवार यांनी कंगना रणौत प्रकरणाबाबत केलेले हे वक्तव्य सूचक आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार लवकरच पडेल असेही आठवले यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 9:07 pm

Web Title: the ruling shiv sena should not do bullying in the case of actress kangana ranaut says ramdas athawale aau 85
Next Stories
1 एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर
2 …तर पुढचं अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्या; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3 राज्य सरकार पुरग्रस्‍तांवर उपकार करत आहे, अशा थाटात पंचनामे केले जात आहेत – सुधीर मुनगंटीवार
Just Now!
X