02 March 2021

News Flash

पुरोगामी महाराष्ट्र शासन आता हळूहळू प्रतिगामी व्हायला लागलं – प्रकाश आंबेडकर

केंद्राचे दिशानिर्देश राज्य सरकार मान्य करत नसल्याचेही सांगितले.

संग्रहीत

“महाराष्ट्र शासन पुरोगामीत्व आणि निर्णय क्षमतेसाठी ओळखलं जातं, पण ते हळूहळू प्रतिगामी होताना दिसतंय. केंद्राने लॉकडाउन उठवण्यासाठी दिलेल्या दिशानिर्देश महाराष्ट्र शासन मान्य करायला तयार नाही. ज्याप्रकारे इतर राज्यांनी मंदिरं आणि आर्थिक केंद्र चालू करून अर्थव्यवस्थेला गती दिली, परंतु महाराष्ट्र शासन त्या दृष्टीने काहीही पावलं उचलत नाही. उलट बेभरवशावरच ठेवलेलं आहे असं एकंदरीत दिसत आहे.” असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्वटिद्वारे महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. ज्यामध्ये त्यांनी एक व्हिडिओ देखील जोडला आहे. या व्हिडिओत ते म्हणतात की, “महाराष्ट्र शासन हे पुरोगामी शासन, आता ते हळूहळू प्रतिगामी व्हायला लागलं आहे. करोना लॉकडाउन उठवतांना केंद्राने अनेक दिशानिर्देश दिले, परंतु महाराष्ट्र शासन त्यांना मान्य करायलाच तयार नाही. आरोग्य सेतूचे अॅप आले, त्यातून लोकांची तब्येत कशी आहे हे कळते. करोनाबाधित आहे की नाही हे कळते. परंतु महाराष्ट्र शासनाने अजुनही लॉकडाउन उठवला नाही, अशी परिस्थिती आहे. कदाचित या व्हिडिओनंतर उठवतील अशी परिस्थिती आहे.”

तसेच, “इतर राज्यांमध्ये सुद्धा मी फिरतो आहे. इतर राज्यांनी मंदिरं उघडली. तिथला व्यवसाय व भक्तांसह दोघांचीही सांगड घातली. परंतु अजुनही महाराष्ट्र शासन मंदिरं उघडायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूस इतर राज्यांनी आर्थिक घडामोडी सुरू केल्या आहेत. परंतु महाराष्ट्र शासन त्या दृष्टीने काहीही पावलं उचलत नाही. उलट बेभरवशावरच ठेवलेलं आहे असं एकंदरीत दिसत आहे. महाराष्ट्र शासनाने पुरोगामीत्व व निर्णय घेणारं राज्य असं पुन्हा उभं करावं, ही विनंती.” असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

या अगोदर “मराठा आंदोलनकर्त्यांना सरकारनं विश्वास दिला नाही. महाविकास आघाडीचं सरकार अतिरेक करत आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या दिशानिर्देशाची अंमलबजावणी करत नाही. वारकरी संप्रदायाने सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे महाराष्ट्रमध्ये मंदिरे उघडी केली जात नाही. सरकार वारकऱ्यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहे असं दिसतं आहे,” असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 5:09 pm

Web Title: the state government does not accept the centres guidelines prakash ambedkar msr 87
Next Stories
1 “बॉलिवूडला संपवण्याचे, इतरत्र हलवण्याचे प्रकार कधीही सहन केले जाणार नाहीत”; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2 चित्रपटगृह सुरू करण्यासाठी ‘एसओपी’ तयार, पण…; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
3 ….तर आजचे ठाकरे सरकार शिवसेनेची देखील चौकशी करणार का? – शेलार
Just Now!
X