ब्रुक फार्माच्या मालकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर, भाजपा आमदार प्रसाद लाड आदींनी रात्री पोलीस ठाणे गाठले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील विचारला. एवढच नाहीतर भाजपा नेते आणि पोलिसांमध्येही वाद झाल्याचे समोर आले. या घटनेवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कारण, सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून फडणवीस, दरेकर यांच्यासह भाजपावर जोरदार टीका केली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष व भाजपाच्या नेत्यांमध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकारपरिषद घेत, महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

“माझा मुख्यमंत्र्यांवर स्पष्ट आरोप आहे की ते कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत. हा कट्टीचा डाव देवेंद्र फडणवीसांबरोबर आहे. ज्यावेळी विरोधी पक्षनेते माध्यमासमोर येतात व भूमिका मांडतात. तेव्हा राज्य सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची भूमिका असते जी त्यांनी स्पष्ट करायला हवी होती. परंतु याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणताही फोन फडणवीस किंवा दरेकर यांना केला नाही. शिवाय, रूग्णांच्या मृत्यूंना राज्य सरकार जबाबदार आहे.” असा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.

ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; फडणवीस आणि दरेकरांकडून पोलिसांची खरडपट्टी

पत्रकारपरिषदेत बोलतान प्रसाद लाड म्हणाले, “आज सर्वप्रथम या प्रकरणी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट केल्याचं समोर आलं आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची भीती एवढी निर्माण झाली आहे की, राष्ट्रीय पातळीवर देखील यांना दखल घ्यावी लागत आहे. हे प्रियंका गांधी यांच्या ट्विट वरून स्पष्ट झालं आहे.”

“मंत्र्यांच्या ओएसडीने दुपारी फोन करून धमकी दिली अन् त्यानंतर….,” फडणवीसांचा गंभीर आरोप

तसेच, “आम्ही सात-आठ दिवसांपूर्वी रेमडेसिवीरसाठी दमण येथील ब्रुक्स फार्माच्या फॅक्टरीत गेलो होतो. त्यावेळी काही माध्यम प्रतिनिधी देखील आमच्या सोबत होते. त्या कंपनीतील कामाची सर्व शुटींग आम्ही केलेली आहे. त्या कंपनीच्या मालकाने जेव्हा आपल्याला रेमडेसिवीर देण्याचं मान्य केलं. त्यानंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राजेंद्र शिंगणे यांना एक पत्र पाठवलं होतं व आपली भूमिका स्पष्ट केली होती की, ५० हजार रेमडेसिवीर आम्ही भाजपाच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणू इच्छित आहोत, परंतु ते आम्ही राज्य सरकार किंवा एफडीएला देणार आहोत. ही कल्पना सीताराम कुंटे यांना देखील फोन करून देण्यात आली होती व हा साठा आम्ही राज्यसरकारडे देणार असल्याचे सांगून परवानगी देखील मागितली होती. हे झाल्यानंतर आम्ही राज्य सरकारकडे देखील पाठपुरवठा केला, चार दिवसानंतर राज्य सरकारने रेमडेसिवीर बनवणाऱ्या ११ फॅक्टरींना परवानगी दिली. यामध्ये ब्रुक फार्माचं नाव देखील दहव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे राज्य सरकार जो आरोप करतं आहे की, ब्रुक फार्मा ही कंपनी भाजपाच्या लोकांची आहे, किंबहुना भाजपाच्या लोकांनी साठा करून ठेवला आहे. हे चुकीचं आहे, ११ कंपन्यांच्या यादीत या देखील कंपनीचा समावेश आहे.”

“दुपारी मंत्री दम देतात, संध्याकाळी फार्मा कंपनीच्या मालकाला दहशतवाद्यासारखं घरातून उचललं जातं ”

“ज्यावेळी ब्रुक फार्मासाठी संबधित एफडीए महाराष्ट्राची परवानगी हवी होती. दमण सरकारन परवानगी दिली, केंद्र सरकारचे संबधित मंत्री मांडवीय यांनी देखील परवानगी दिली. करोना परिस्थितीत खरंतर ब्रुक फार्मा ही कंपनी १०० टक्के निर्यात करणारी कंपनी आहे. मात्र देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्या विनंतीवरून त्यांनी दिवसाला १५ हजार रेमडेसिवीर बनवून महाराष्ट्राला पुरवठा करण्याबाबत सांगितले. अशा परिस्थितीत जर राज्य सरकारला रेमडेसिवीर मिळत असेल, तर मला असं वाटतं की यामध्ये कुणाचं श्रेय आहे किंवा नाही यापेक्षा देखील राज्य सरकारने जर हे मान्य केलं असतं, जनतेचा विचार केला असता, तर मला वाटतं की महाराष्ट्रात हजारो लोकांचे जीव आज जे रेमडेसिवीर नसल्यामुळे जात आहे, ते जीव कदाचित वाचले असते आणि महाराष्ट्रातील जनतेला एक चांगल्या प्रकारच्या औषधाचा पुरवठा देखील झाला असता.” असं देखील यावेळी त्यांनी बोलन दाखवलं.

पोलिसांवर दबाव खपवून घेणार नाही; गृहमंत्र्यांचा फडणवीसांना इशारा!

याशिवाय “जर देवेंद्र फडणवीस राज्यासाठी ५० हजार रेमडेसिवीर आणून देऊ शकत आहेत, किंबहूना त्याच्याही पुढे जाऊन राज्य सरकारने टेंडरच्या माध्यामातून किंवा करोना परिस्थितीत थेट खरेदीच्या माध्यमातून दिवसाला १०-१५ हजार रेमडेसिवीर मिळू शकत आहेत. परंतु ज्या कंपनीचा मालक रेमडेसिवीर द्यायला तयार झाला, त्याच्यशी चर्चा करायची नाही, राजेंद्र शिंगणे यांच्या ओएसने त्याला दरेकरांच्या पीएच्या फोनवर फोन करून धमकी देतात आणि त्या मालकाला म्हणतात की तुम्ही फडणवीस यांना रेमडेसिवीर देत आहात व आम्हाला देत नाहीत असं कसं चालू शकतं? पण मुळात फडणवीस यांना रेमडेसिवीर देण्याचा प्रश्न यात येतोच कुठे? हा जो रेमडेसिवीरचा साठा येणार होता तो महापालिका, राज्य सरकार, एफडीएच्या माध्यमातून वितरीत केला जाणार होता. परंतु ज्या पद्धतीने सत्ताधारी नेत्यांनी आरोप केले आहेत, की रेमडेसिवीर भाजपा कशी काय आणू शकते, तर यावर हे सांगावसं वाटतं की भाजपा आणत नाही ते आणण्याची व्यवस्था करत आहे. कंपनीच्या मालकाला फोन येतो, धमकी दिली जाते. मी बांद्रा येथील एफडीए कार्यालयात मी स्वतः गेलो होतो, तिकडे मला महाराष्ट्र सरकारचं हे पत्र मिळालं ज्या पत्राच्या माध्यमातून ब्रुक्स फार्माला एफडीए महाराष्ट्राने पत्र दिलेलं आहे. ज्यामध्ये ते स्पष्टपणे लिहीत आहेत की तुम्ही महाराष्ट्र सरकारला व खासगी एजन्ट्सला देखील रेमडेसिवीर विकू शकतात. असं असताना देखील राज्य सरकार रात्रीच्या रात्री पोलिसांना माहिती मिळाली असल्याचं सांगून जसा एखादा दहशतवादी आपण पकडायला जातो, तशा पद्धतीने पोलिसांचं पथक पाठवून जो माणूनस हजार कोटींची उलाढाल करतो, जो माणूस महाराष्ट्राला मदत करायला पुढे येतो त्याला एखाद्या आरोपीसारखं पकडून आणतात आण त्याला नको नको ते प्रश्न विचारले जातात”, असं यावळी प्रसाद लाड म्हणाले.