21 January 2021

News Flash

राज्यात करोनाच्या संसर्गात होतेय वाढ; दिवसभरात पाच हजार बाधितांची नोंद

आज १०० रुग्णांचा झाला मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात करोनाच्या संसर्गात वाढ होत असल्याचे चित्र आहे. कारण गेल्या काही दिवसांत कमी होत झालेल्या बाधित रुग्णांची संख्येत गेल्या तीन दिवसांपासून वाढ होत आहे. आज दिवसभरात राज्यात ५,०११ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या करोना बाधितांच्या संख्येमुळे राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ही १७,५७,५२०वर पोहोचली आहे. तर आज ६,६०८ रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने आणि त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात सध्या ८०,२२१ अॅक्टिव्ह रुग्ण असून आजवर १६,३०,१११ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४६,२०२ रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 9:15 pm

Web Title: the state is experiencing an increase in corona patients five thousand victims were recorded during the day aau 85
Next Stories
1 भाजपाच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटींच्या जवळपास पोहचली – नितीन राऊत
2 नांदेड : प्रेमी युगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
3 लोकच ओढवून घेणार करोनाची दुसरी लाट !
Just Now!
X