News Flash

टँकरने कारला पाठीमागून दिली जोरदार धडक; चार जण जखमी!

मुंबई - नाशिक महामार्गावर घडला भीषण अपघात

प्रतिकात्मक छायाचित्र

– दत्तात्राय भरोदे

भरधाव वेगात धावणाऱ्या टँकरने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि कार पुढे चालणाऱ्या कंटेंनरला जाऊन धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कार धील चौघेजण जखमी झाले आहेत. मुंबई – नाशिक महामार्गावर वासिंद बायपास ला दहागाव फाट्याजवळ दुपारी एक वाजेच्या सुमारास झालेल्या या विचित्र अपघातात कार चालकासह जखमी झालेले चौघेजण कंटेनर चालकाच्या प्रसंगावधानाने सुदैवाने बचावले असून, त्यांच्यावर शहापुरात उपचार सुरू आहेत.

मुंबई – नाशिक महामार्गावर वासिंद बायपासला मुंबई दिशेकडे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक नाशिक दिशेकडून सुरू होती. दहागाव फाट्याजवळ ही वाहतूक वळविण्यात आली होती. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारला पाठीमागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कार पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून धडकली व कंटेनर मध्ये अडकली. कंटेनर चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत कंटेनर थांबवल्याने पुढील अनर्थ टळला व कार मधील चौघे जण सुदैवाने बचावले.

या अपघातग्रस्तांना दोन जेसीबीच्या सहाय्याने कार मधून बाहेर काढण्यात आले. प्रविण देसले, रोशन डिंगोरे, शैलेश देसले व शंकर देसले हे चौघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर शहापूर उपजिल्हारुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात पुढून व मागून धडक लागल्याने कारचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत अधिक तपास वासिंद पोलीस करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 6:29 pm

Web Title: the tanker hit the car in the back four injured msr 87
Next Stories
1 चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठवली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!
2 ‘तौते’ चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीसंदर्भात झालेल्या निर्णयाची एकनाथ शिंदेंनी दिली माहिती, म्हणाले…
3 महाराष्ट्रातला लॉकडाउन कायम, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील- राजेश टोपे
Just Now!
X