अर्नाळा पोलीस ठाणे परिसरात आढळलेली एक वस्तू टाइम बॉम्ब असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र ही वस्तू टाइमबॉम्ब नाही तर प्लास्टिकचे पाइप जोडून तयार केलेली वस्तू होती असे आता समोर आले आहे. अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र BDDS च्या पथकाने या ठिकाणी येऊन ही वस्तू बॉम्ब नसल्याची खात्री केली आहे. प्लास्टिक पाइपला लाल रंग देऊन ते एकमेकांना जोडण्यात आले होते. ही वस्तू कोणी ठेवली याचा शोध आता पोलीस घेत आहेत. पुढील तपास सुरु आहे अशी माहिती पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. ही वस्तू बॉम्ब असावा असा संशय काही स्थानिकांना आला त्यांनी पोलिसांना बोलावल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी ही वस्तू तपासली. तसेच BDDS पथकालाही पाचारण केले ज्यांनी ही वस्तू बॉम्ब नसल्याचे म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 6, 2018 2:01 pm