03 August 2020

News Flash

सोलापुरात करोनाबळींची मालिका सुरूच; रूग्णसंख्या ५८३ वर, मृतांचा आकडा ५१वर

सोलापुरात आज करोनाबाधित नवे १८ रूग्ण आढळून आले.

संग्रहित छायाचित्र

सोलापुरात आज करोनाबाधित नवे १८ रूग्ण आढळून आले. तर पाच वृध्दांचा मृत्यू झाला. गेल्या पाच दिवसांत रूग्णसंख्या १२७ तर मृतांची संख्या २१ ने वाढली आहे.

आज करोनाशी संबंधित १२० चाचणी अहवाल प्राप्त होऊन त्यापैकी २८ अहवाल पॉझिटिव्ह निघाले. यात ८ महिलांचा समावेश आहे. तर दोन महिलांसह पाच वृध्दांचे बळी गेले आहेत. आतापर्यंत रूग्णांची संख्या ५८३ झाली असून यात ३२३ पुरूष आणि ३६० महिलांचा समावेश आहे. तर आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्याही पाचने वाढून ५१ वर पोहोचली आहे. दरम्यान, आज रूग्णालयातून करोनामुक्त होऊन पाच रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. त्यामुळे करोनामुक्त व्यक्तींची एकूण संख्या २५४ झाली आहे. सध्या रूग्णालयात २७८ रूग्ण उपचार घेत आहेत.

करोनाचा फैलाव वरचेवर वाढत असताना मागील पाच दिवसांत रूग्णांचा आकडा आणखी पुढे गेला आहे. २० मे रोजी करोनाबाधितांची संख्या ४५१ होती. त्यात १२७ रूग्णांची भर पडली. तर मृतांचा आकडाही ३० वरून ५१ वर गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2020 9:29 pm

Web Title: the total number of corona patients in solapur is 583 the death toll is 51 aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 बुलडाण्यात पाच वर्षीय चिमुकलीची करोनावर मात; एक रुग्ण नव्याने आढळला
2 राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ५० हजारांच्या घरात; दिवसभरात आढळले ३ हजार रुग्ण
3 रायगडमध्ये करोनाची व्याप्ती वाढली; दिवसभरात ५० रुग्णांची भर
Just Now!
X