21 September 2020

News Flash

महाराष्ट्रात २४ हजार ८८६ नवे करोना रुग्ण, संख्या १० लाखांच्या पुढे

महाराष्ट्रात आत्तापर्यंत २८ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा करोनामुळे मृत्यू

महाराष्ट्रात २४ हजार ८८६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात ३९३ मृत्यूंची नोंद झाली आहे. या संख्येमुळे महाराष्ट्रातील एकूण करोना रुग्णांची संख्या १० लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या आता १० लाख १५ हजार ६८१ इतकी झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ७ लाख १५ हजार २३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत २८ हजार ७२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात २ लाख ७१ हजार ५६६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज राज्यात १४ हजार ३०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत ७ लाख १५ हजार २३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.४ टक्के झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा २.८३ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५० लाख ७२ हजार ५२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १० लाख १५ हजार ६८१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६ लाख ४७ हजार ७४२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३८ हजार ४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला २ लाख ७१ हजार ५६६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात २४ हजार ८८६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १० लाख १५ हजार ६८१ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 8:48 pm

Web Title: the total number of covid19 cases in maharashtra crosses the 10 lakh mark with 393 deaths 24886 fresh positive cases reported today scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
2 कोव्हिड १९ साहित्य चढ्या दराने विकणाऱ्या पुरवठादारांविरोधात फौजदारी गुन्हा
3 कोल्हापुरात दहा केंद्रात मोफत करोना चाचणी सुविधा
Just Now!
X