News Flash

आषाढीची परंपरा कायम राहणार, माऊलींचा पालखी सोहळा निघणारच : देवव्रत वासकर महाराज

समन्वय समिती सरकारशी चर्चा करणार, सर्व नियमांचे पालन होणार

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

मंदार लोहोकरे
देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाकडून विविध निर्बंध लादण्यात आलेले आहेत. राज्यभरातील अनेक महत्वाची मंदिरं काही दिवसांसाठी दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील विठुरायाचे मंदिरही बंद आहे. अशावेळी परंपरेनुसार दरवर्षी निघणारी ज्ञानेश्वर माऊलींची आषाढीची वारी यंदा निघणार की नाही, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.  अखरे आषाढीची प्रथा, परंपरा कायम राखत माऊलीचा पालीख सोहळा निघणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षीचा आषाढी वारी पालखी सोहळा हा निघणारच आहे. प्रथा,परंपरा खंडीत होणार नाही. तसेच कोणताही प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. या बाबत सरकारशी चर्चा करणार असल्याचे माऊली पालखी सोहळ्याचे मानकरी ह.भ.प. देवव्रत वासकर महाराज यांनी जाहिर केले आहे.

आज आषाढी यात्रेबाबत आळंदी येथील  संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या प्रमुखांची व्हिडिओ काँन्फरसिंगद्वारे चर्चा झाली. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड विकास ढगे पाटील, आरफळकर मालक, शितोळे सरदार , देवव्रत वासकर महाराज, राजाभाऊ चोपदार,अभय टिळक, कुलकर्णी, जळगावकर महाराज आदींनी चर्चेत सहभागी झाले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी सोहळा होणार का ? यासाठी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनाची आज सकाळी 9 वाजता सर्व प्रमुख संतांच्या पालखी सोहळा समन्वयकांशी बैठक झाली.

सध्या अनेक पालख्यांचे मार्ग हे करोनाच्या रेड झोन मधून जातात. यामध्ये माऊलीचा पालखीसोहळा थेट पुणे येथून न जाता. सासवड येथून पंढरपूरकडे न्यावा. असे मार्ग यावर्षीसाठी योग्य ठरू शकतात. असेच प्रयोजन इतर पालखीसोहळ्याबाबत केले पाहीजे. तसेच एखाद्या पालखी सोहळ्याला जर ठराविक व्यक्तींची परवानगी मिळाली. तर संबंधित परवानगी ही सर्वच पालखीसोहळ्याला लागू असेल. तसेच प्रत्येक पालखी सोहळ्यासोबत एक वैद्यकीय पथक देखील असणार आहे. यामध्ये संपूर्ण पायी पालखी सोहळा हा सोशल डिस्टन्स पालन करून केला जाणार आहे.

यंदा पालखी सोहळा प्रस्थान करीत असताना आवश्यक त्या ठिकाणी मार्ग बदलून मोठ्या डामडौलात पंढरपूरी जाईल. यामध्ये अंत्यत कमी माणसांचा समावेश असेल. या सर्व बाबींच्या अनुषंगागे यापुढच्या काळात एक समन्वय समिती सरकारशी चर्चा करेल आणि सरकारी सूचनांचा विचार करुनच पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे सदरच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 12:19 pm

Web Title: the tradition of ashadi will continue maulis palkhi ceremony will leave devvrat vaskar maharaj msr 87
Next Stories
1 संरक्षण साधनांबरोबरच पैसैही देऊ; ठाकरे सरकारची खासगी डॉक्टरांना हाक
2 Coronavirus : औरंगाबादेत 28 नवे रुग्ण, एकूण संख्या 349 वर
3 ग्रीन झोनचे स्वप्न पाहणाऱ्या सिंधुदुर्गची रेड झोनच्या दिशेने वाटचाल – नितेश राणे
Just Now!
X