News Flash

करोनाच्या संकटातून सगळं जग फिनिक्स भरारी घेईल-सिंधुताई सपकाळ

सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

संग्रहित छायाचित्र

करोनाचं संकट मागे टाकून सगळं जग फिनिक्स भरारी घेईल असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी केलं आहे. सध्या सगळ्यांनी सगळ्यांना सांभाळण्याचा काळ सुरु आहे. आपला देश मुक्ताई, ज्ञानेश्ववर, बहिणाबाईंचा आहे. थोडी वाट बघा या सगळ्यातून आपण नक्की बाहेर पडू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या घडीला सगळ्यांची भूक महत्त्वाची आहे. पोलीस आणि डॉक्टर्स यांचीही काळजी घ्या असंही त्या म्हणाल्या. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. एक भाकरी आपण सगळे मिळून खाऊ असंही त्या म्हणाल्या.

“फक्त आमच्या मुलांचीच नाही तर सगळ्यांचीच भूक महत्त्वाची आहे. करोनासारख्या आजारातून आपण सगळेजण शिकतो आहोतच. हे संकट माणसांची मनं अलवार केल्याशिवाय राहणार नाही. हे संकट दुःखाची जाणीव दिल्याशिवाय राहणार नाही. या संकटाच्या इतक्या ज्वाळा उठल्या आहेत तरीही लोक, जनता, लेकरं ही फिनिक्स भरारी घेतील याची मला खात्री मला आहे. हे संकट संपणार आहे.. ही रात्र सरुन उद्याची स्वप्न आपण पाहणार आहोत”

कल की बात खुदा के हात, आपल्याला जगायचं आहे हा विचार प्रत्येकाच्या मनात. त्यातून चांगलंच होणार आहे असंही सिंधुताई म्हणाल्या. हे संकट संपल्यानंतर नवराष्ट्राची निर्मिती होईल. वाईट पणा सोडून द्या मानवता शिका असंही माई म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 10:07 pm

Web Title: the world will fly out from the ash like a phoenix after corona says sindhutai sapkal scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: थेट निधी खर्च करण्यास सहकारी संस्थांना मुभा
2 पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून घेत आत्महत्या
3 टाळेबंदीत अन्नधान्य वितरण करणाऱ्या, अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना अल्पदरात अन्न धान्य
Just Now!
X