प्रबोध देशपांडे
अकोला : जिल्ह्यात करोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असून, मृत्यूदरही चिंताजनक आहे. करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण अद्याापही कमी करता आलेले नाही. या परिस्थितीत अकोल्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालय कार्यरत असते तर करोना मृत्यूवर नक्कीच नियंत्रण असते, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. या रुग्णालयाची इमारत सज्ज असतांना केवळ पदांच्या आकृतीबंधाच्या अभावी ते सुरू होऊ शकले नाही. करोनाच्या गंभीर संकटात ‘सुपर स्पेशालिटी’ पांढरा हत्ती ठरला आहे. त्यासाठी राजकीय उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.
प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनेच्या फेज-३ अंतर्गत अकोल्यासह राज्यात चार ठिकाणी वैद्यकीय महाविद्याालयात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले. यासाठी प्रत्येकी १५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये कार्डीओलॉजी, कार्डीओ व्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी, न्युरोलॉजी, न्युरोसर्जरी, नेफ्रॉलॉजी, प्लास्टिक सर्जरी, बर्नस हे विभाग मंजूर आहेत. यामध्ये १६० खाटांचे नियोजन आहे. या व्यतिरिक्त डायलिसिस युनीट १४ खाटा, अतिदक्षता विभाग ४४, एनआयसीयू २० या अतिविशेष सेवेसाठी खाटा आहेत.

सुपर स्पेशालिटी सुरू करण्यासाठी पदांचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला. या रुग्णालयासाठी एक हजार १६ पदांचा आकृतीबंध तयार करण्यात आला होता. वैद्याकीय शिक्षण विभागाच्या संचालकांकडे हा प्रस्ताव सादर केल्यावर पदांना कात्री लागली. वैद्याकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव व राज्याचे मुख्य सचिवांकडे यावर चारही महाविद्याालयांच्या अधिष्ठातांची बैठकही झाली. यामध्ये अकोल्यातील रुग्णालयासाठी ४६७ पदांचा आकृतीबंध तयार करून पुढील मान्यतेसाठी सादर करण्यात आला. या प्रक्रियेलाही पावणे दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला. पदांच्या मंजुरीची अद्याापही प्रतीक्षा आहे. पदांच्या आकृतीबंधच्या दिरंगाईमुळे सुपर स्पेशालिटी सुरू होण्यास चांगलाच विलंब झाला आहे.
अकोल्यात सध्या करोनाचा उद्रेक सुरू आहे. आतापर्यंत ६४ जणांचे बळी गेले. या संकटात सुपर स्पेशालिटीचा मोठा आधार मिळाला असता. गंभीर आजारी करोनाबाधितांवर तात्काळ अत्याधुनिक उपचार होऊन मृत्यूदर कमी करण्यास मदत झाली असती, असे वैद्याकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्वोपचार रुग्णालयावरील ताणही कमी झाला असता. मात्र, दुर्दैवाने पदांअभावी सुपर स्पेशालिटी सुरूच होऊ शकले नाही. याचा पाठपुरावा करण्यातही कायम दुर्लक्ष झाले. रुग्णालयाची सज्ज इमारत शोभेची वस्तू ठरत आहे.

इमारतीवर ८२ कोटी ५४ लाखांचा खर्च
अकोला येथील इमारतीचे बांधकाम १२ हजार ६८० चौ.मी. असून, रुग्णालयालगतच्या ४.५ एकर जागेमध्ये या सुपर स्पेशालिटीचे निर्माण करण्यात आले. इमारतीसाठी ८२ कोटी ५४ लाख रुपये खर्च, तर अद्यायावत यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठी ६५ कोटींचे नियोजन आहे. अकोल्यातील इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाले.

सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात लवकरच आढावा घेणार आहे. पदांची समस्या मार्गी लागण्यासाठी वरिष्ठ पातळीवरही पाठपुरावा करण्यात येईल.
– बच्चू कडू, पालकमंत्री, अकोला.