करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात अद्यापही वाढत असला तरी, नवे करोनाबाधित आढळण्याबरोबरच आता करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. सर्वात जास्त करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र राज्यासाठी ही निश्चितच दिलासादायक बाब म्हणावी लागेल. आज राज्यात १३ हजार ३४८ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

राज्यात आज दिवसभरात १२ हजार २४८ नवे करोनाबाधित आढळले, तर ३९० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. याचबरोबर आज दिवसभरात १३ हजार ३४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता ५ लाख १५ हजार ३३२ वर पोहचली आहे. यामध्ये करोनामुक्त झालेले ३ लाख ५१ हजार ७१० जण, सध्या उपचार सुरू असलेले १ लाख ४५ हजार ५५८ रुग्ण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १७ हजार ७५७ जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

मुंबईत आज दिवसभरात १ हजार ६६ नवे करोनाबाधित आढळले, तर ४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. याचबरोबर मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २३ हजार ३९७ वर पोहचल आहे. यामध्ये आतापर्यंत रुग्णालयातून सुट्टी मिळालेले ९६ हजार ५८६ जण, सध्या उपचार घेत असलेले १९ हजार ७१८ रुग्ण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ६ हजार ७९६ जणांचा समावेश आहे.