News Flash

शिखर बँक घोटाळा: पुराव्यांमध्ये शरद पवारांचे नाव नाही – अण्णा हजारे

"पवारांचा जर याच्याशी संबंध नसेल आणि तरीही त्यांचे नाव पुढे आले असेल तर या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी."

अण्णा हजारे, शरद पवार

राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताने राज्यासह देशभरात खळबळ उडाली होती. मात्र, आता या घोटाळ्याचे पुरावे ज्यांनी सादर केले होते, त्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याप्रकरणी शरद पवारांचे नाव या पुराव्यांमध्ये नसल्याचे सांगत पवारांना क्लीनचीट दिली आहे. राळेगणसिद्धी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

अण्णा हजारे म्हणाले, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आपल्याकडील पुराव्यांमध्ये शरद पवारांचे नाव नव्हते तरीही त्यांचे नाव यामध्ये कसे आले हे आपल्याला माहिती नाही. पवारांचा जर याच्याशी संबंध नसेल आणि तरीही त्यांचे नाव पुढे आले असेल तर या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.

माझ्याकडे असलेल्या पुराव्यांमध्ये शरद पवारांचे नाव नाही हे सत्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर खोटे आरोप करणे चुकीचे आहे. जे दोषी नाहीत त्यांना विनाकारण अकडवण्यात येऊ नये. उलट माझ्याकडील पुरावे चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करुनही त्यांनी याप्रकरणी कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करायला हवेत, अशी मागणीही यावेळी हजारे यांनी केली.

शिखर बँकेने सहकारी कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयांची कर्जे दिली. मात्र, कारखान्यांनी ही कर्जे बँकेला परत केली नाहीत. त्यामुळे बँकेनी संबंधीत कारखान्यांवर जप्ती आणत ते कवडीमोल भावाने विकले. ही संशयास्पद बाब असून कारखाने जाणीवपूर्वक आजारी पाडले गेले असावेत अशी मला शंका आहे. सीआयडीनेही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत यात कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे या गैरव्यवहारात अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचीही शंका असल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल करायला हवेत. याप्रकरणी अधिक चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना आपण पत्र पाठवणार असल्याचे अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2019 3:00 pm

Web Title: there is no name of sharad pawar in the evidences of the state co operative bank scam says anna hazare aau 85
Next Stories
1 ‘टायगर अभी जिंदा है’ च्या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचा परळी बंद
2 अहमदनगरमध्ये ट्रक-कारचा भीषण अपघात, चार जण जागीच ठार
3 “आजपासून वंचितचे काम करणार नाही”, गोपीचंद पडळकर यांचा राजीनामा
Just Now!
X