News Flash

शिखर बँक प्रकरणात एका पैशाचाही भ्रष्टाचार झालाच नाही, अजित पवारांचा दावा

शरद पवार यांचं नाव हेतुपुरस्सर गोवलं गेलं असाही आरोप अजित पवार यांनी केला

संग्रहित छायाचित्र

शिखर बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजित पवार यांनी आता शिखर बँक प्रकरणात एका पैशाचाही भ्रष्टाचार झालाच नाही असा दावा केला आहे. एवढंच नाही तर शरद पवार या बँकेच्या संचालकपदीही नव्हते तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई फक्त सूडबुद्धीने करण्यात आली आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. एकीकडे निवडणूक जाहीर झाली आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. त्यात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ईडीने शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर गुन्हा दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

दरम्यान शिखर बँक प्रकरणात एकाही पैशाचा भ्रष्टाचार झाला नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. २३ सप्टेंबरला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास शिखर बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला. आघाडीची सत्ता असताना शिखर बँकेचा २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. दरम्यान ईडीने ही कारवाई सूडबुद्धीने केली आहे असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. तर ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात जाऊन पाहुणचार घेणार असल्याचं शरद पवार यांनी काही वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

अजित पवारांनी शरद पवार यांचं नाव या सगळ्या प्रकरणात हेतुपुरस्सर गोवलं जात असल्याचंही म्हटलं आहे. शरद पवार एकाही बँकेच्या संचालाकपदावर नव्हते मग त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केलाच कसा काय? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2019 3:58 pm

Web Title: there is no scam of single rupee in shikhar bank case says ajit pawar scj 81
Next Stories
1 “भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष, पण माझ्याविरोधात निष्ठावंत मिळेना”
2 शुक्रवारी मी स्वतःच ईडी कार्यालयात जाऊन ‘पाहुणचार’ स्वीकारणार : शरद पवार
3 ईडीने शरद पवारांवर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही : मुख्यमंत्री
Just Now!
X