01 October 2020

News Flash

लॉकडाउन राहणारच, पण टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला देणार गती – अजित पवार

करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनची मुदत तीन मेपर्यंत वाढवण्यात आल्याने तोपर्यंत रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार बंद राहणार आहेत. मात्र, कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी, २० एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

देशातील लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काल मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी त्याचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मार्गदर्शक नियमावलीनुसार ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसाय, व्यापारी आस्थापनांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवण्यात आली असली तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यापुढेही नियमित सुरु राहील, त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबावं, घराबाहेर पडू नये असं आवाहनही त्यांनी केलं.

आणखी वाचा- १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत करणार ठाकरे सरकार

हे उद्योग होणार सुरु

लॉकडाउनसंदर्भात केंद्राच्या सूचनांचे राज्यात काटेकोर पालन करण्यात येत आहे. लॉकडाउन लागू असला तरी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी आहे. दवाखाने, रुग्णालये, औषधांची दुकाने, पॅथोलॉजी सेंटर, ॲम्बुलन्स सेवा सुरु आहेत. शेतीच्या मशागतीच्या कामांवरही कोणतेही बंधन नाही. शेती आणि शेती उद्योगाशी संबंधीत सर्व कामे, दुकाने, व्यवहार सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तूर, कापूस, हरभरा खरेदी योजना देखील सुरु राहणार आहेत. दूधव्यवसाय, पशुपालन, मत्स्योद्योगविषयक कामांनाही परवानगी आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरु राहणार आहेत. अनाथालये, वृद्धाश्रम आदी सामाजिक संस्थांचं कामकाजही सुरु राहील. अंगणवाड्या बंद असल्या तरी बालकांना पोषणआहार घरपोच दिला जाणार आहे. शाळा, कॉलेज बंद असली तरी ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे. बँका, वित्तीय संस्थांचे व्यवहार सुरु राहणार असले तरी नागरिकांनी तिथे गर्दी करु नये, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

राज्यातील करोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी लॉकडाउनला सर्वांनी सहकार्य करावं, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये अंतर राखावं, घरातूनच काम करा, घरातंच रहा, सुरक्षित रहा, टाळेबंदीचं पालन करा, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 3:14 pm

Web Title: there will be a lockdown but it will speed up the economy by phase says ajit pawar aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत करणार ठाकरे सरकार
2 “जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांची आम्ही काळजी घेतोय”; वर्धा जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा
3 सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची मदत
Just Now!
X