News Flash

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षांसाठी महाराष्ट्रातील शाळांची फी वाढ नाही

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ही माहिती दिली आहे

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षांसाठी महाराष्ट्रातील शाळांची फी वाढ करण्यात येणार नाही असं महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने म्हटलं आहे.तसंच पालकांना शाळेची फी भरण्यासाठी महिन्याचा किंवा तीन महिन्यांचा पर्याय देण्यात यावा असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच २०१९-२० या वर्षाची काही फी राहिली असेल तर ती भरण्यासाठी सक्ती करु नये असंही महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने म्हटलं आहे. लॉकडाउन संपल्यानंतर ती फी घेण्यात यावी असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्य सरकारने लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही असं शिक्षण विभागाने म्हटलं आहे. शाळांनी एकदम वार्षिक फी भरावी अशी सक्ती कोणत्याही शाळेनं करु नये असंही शिक्षण विभागाने म्हटलं आहे. त्याऐवजी मासिक किंवा त्रैमासिक फी भरण्याचा पर्याय पालकांना द्यावा असेही निर्देश देण्यात आले आहेत.

WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने करोनाला जागतिक महामारी घोषित केलं आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. अशा स्थितीत शैक्षणिक संस्था, शाळांनी विद्यार्थी आणि पालकांना मागील वर्षाची उर्वरित फी भरण्याची सक्ती करु नये. लॉकडाउन संपल्यानंतर उर्वरित फी घ्यावी, तसेच चालू शैक्षणिक वर्षात फी वाढ करु नये असेही निर्देश देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 1:09 pm

Web Title: there will be no hike in school fee for this academic year 2020 21 says maharashtra education department scj 81
Next Stories
1 समन्वय, संतुलन व संवेदना ही आचारसंहिता स्वीकारा : खासदार सहस्त्रबुद्धे
2 घर बसल्या पाहा शिर्डीच्या साईबाबाची LIVE आरती
3 भाजपाच्या निर्णयावर रामदास आठवले नाराज, एक जागाही दिली नाही
Just Now!
X