18 September 2019

News Flash

नाशिकमध्ये स्टेट बँकेचे एटीएम फोडून ३१ लाख रुपये लंपास

एटीएम फोडण्याची दोन दिवसातली दुसरी घटना

नाशिकच्या मखमलाबाद चौकात स्टेट बँकेचे एटीएम फोडण्यात आले आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. एटीएम फोडून ३१ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. दोन दिवसातली ही दुसरी घटना आहे. काल म्हणजेच बुधवारीही चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले होते. आता पुन्हा एकदा तशीच घटना घडली आहे.

आज पहाटेच्या सुमारास मखमलाबाद या ठिकाणी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी फोडले. हे एटीएम फोडून चोरट्यांनी ३१ लाखांची रोख रक्कम लंपास केली. पोलिसांनी ही घटना समजताच पोलीस या ठिकाणी दाखल झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे. दोन दिवसात दोनवेळा एसबीआयचे एटीएम फोडून पैसे लंपास केल्याने या एटीएम फोडणाऱ्या टोळीला शोधण्याचे आव्हान नाशिक पोलिसांसमोर आहे.

First Published on August 22, 2019 1:34 pm

Web Title: thieves broke sbi atm in nashik looted 31 lakhs scj 81