मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पूर्व धारगड वनक्षेत्रामध्ये दर्शन

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पूर्व धारगड वनक्षेत्रामध्ये अत्यंत दुर्मीळ अशा ‘ठिपकेदार कस्तूर’ या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे.

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार

अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त गजेंद्र बावणे, अजय लहाने, सहाय्यक आयुक्त भूसुधार श्याम मस्के, राहुल गुप्ता आणि मनोज बिंड यांना ७ मार्च रोजी निसर्ग भ्रमंती करताना हा पक्षी आढळून आला. सर्व कस्तूर वर्गीय पक्ष्यांमध्ये हा ठिपकेदार कस्तूर अधिक आकर्षक दिसतो. या पक्ष्याचे इंग्रजी नाव ‘स्केली थ्रश’ असे असून शास्त्रीय नाव ‘झ्यूथेरा डॉमा’ असे आहे. वनभ्रमंती दरम्यान अचानक झाडीतून नदी काठच्या उंच झाडावर हा पक्षी येऊन बसला.

सतत कूजन न करणारा हा पक्षी अतिशय लाजाळू असल्यामुळे फारसा समोर येत नाही. म्हणून तो सहज दृष्टीसही पडत नाही. घनदाट अरण्यात त्याचे अस्तित्व आढळून येते. नर आणि मादी दिसायला सारखेच असून मादी ही छोटय़ा वाटीसारख्या खोलगट घरटय़ात ३-४ राखडी हिरवट रंगाची अंडी घालते. छोटे कीटक आणि कृमी हे त्यांचे खाद्य. या पक्ष्याच्या दुर्मीळतेमुळे फारशी सविस्तर माहिती उपलब्ध होत नाही व याला अद्याप प्रमाणित मराठी नाव सुद्धा प्राप्त झालेले नाही. ई-बर्ड  सारख्या जागतिक दर्जाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, या पक्ष्याची ही महाराष्ट्रातील छायाचित्रासह खात्रीशीर अशी प्रथमच नोंद ठरल्याचा दावा पक्षीनिरीक्षकांनी केला आहे.

वाघ आणि इतर वन्यजीव याकरिता सुप्रसिद्ध असलेले मध्यभारतातील मेळघाटचे जंगल हे कित्येक दुर्मीळ वनस्पती, विविध प्राणी आणि पक्ष्यांकरिता राष्ट्रीयस्तरावर प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे व्याघ्रदर्शनाची आस घेऊन येणारे पर्यटक, अभ्यासक आणि संशोधक यांनी मेळघाटच्या या जैवविविधतेची सुद्धा योग्य दखल  घेणे गरजेचे आहे .

      – मनोज बिंड , पक्षीनिरीक्षक, अमरावती.

साधारणपणे या पक्ष्याची लांबी २७ ते ३१ से.मी. असते. याच्या शरीराच्या फिकट पिवळसर रंगावरील छोटय़ा छोटय़ा रेषासदृश्य ठिपक्यांची रचना ही त्याची मुख्य ओळखीची खूण आहे. पोटाचा भाग पांढरा असून त्यावरही ठिपके असतात व पाय फिकट नारंगी गुलाबी असतात. मलेशियासह हा पक्षी भारताच्या केवळ उत्तर भागात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे आढळून येतो.