27 May 2020

News Flash

रत्नागिरीत करोनाचा तिसरा रुग्ण सापडला

जिल्ह्यातील या रूग्णांची एकूण संख्या ३

(प्रतीकात्मक छायाचित्र)

रत्नागिरी तालुक्यातील साखरतर अकबर मोहल्ला येथे करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील या रूग्णांची एकूण संख्या ३ झाली आहे.

यापैकी सर्व प्रथम निष्पन्न झालेला गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथील रूग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेला दुसरा रूग्ण जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान साखरतर येथे घरीच राहणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे.  या महिलेला न्यूमोनिया झाला असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तिचा कोणा करोनाबाधित व्यक्तीशी संपर्क आला होता का, याबाबत जिल्हा प्रशासन माहिती घेत आहे.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकारांना सांगितले की, साखरतर येथील ही महिला ताप येत असल्याने गेल्या शनिवारी शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी  गेली होती. तेथील डॉक्टरांनी, करोनाची लक्षणे असल्याचा संशय आल्याने  तिला जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवले. जिल्हा रूग्णालयाने संबंधित महिलेच्या थुंकी, स्वाबचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. मंगळवारी दुपारी प्राप्त झालेल्या  चाचणी अहवालात पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या महिलेला न्यूमोनिया झाला असून तिची परिस्थिती गंभीर आहे. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. साखरतर येथे ‘जमाती’चे काही लोक मुंबईहून आलेले आहेत. त्यांना घरीच विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासमोरच्या घरात ही महिला राहत होती. या महिलेच्या कुटुंबातील १५ जणांना लवकरच तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले जाणार आहे. तसेच ती उपचारांसाठी गेलेल्या खासगी रुग्णालयातील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना केली असल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले.  दरम्यान, साखरतर मोहल्ला सील करण्याची कार्यवाही ग्रामीण पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 12:51 am

Web Title: third corona patient was found in ratnagiri abn 97
Next Stories
1 ओडिशात नक्षल्यांची ‘शस्त्रबंदी’
2 दूध उत्पादकांना करोनाचा फटका
3 जळगावात तीन करोना संशयित महिलांचा मृत्यू
Just Now!
X