धवल कुलकर्णी

महाराष्ट्रातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे लक्षात येताच रक्तदात्यांनी आणि शिबिर आयोजकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले. मात्र सध्या साधारणपणे महिनाभर पुरेल एवढा साठा रक्तपेढ्यांमध्ये असून रक्तदान करणाऱ्यांनी जून महिन्यापर्यंत नियोजन करावे असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता डॉट कॉम शी बोलताना सार्वजनिक आरोग्य खात्यातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले ही रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या मंडळींनी एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने या कार्यक्रमांचे आयोजन करावे. यामुळे या तीन महिन्यांमध्ये गरजूंना आणि रक्तपेढी यांनासुद्धा रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही. सध्या महिनाभर पुरेल एवढा रक्त साठा असल्यामुळे विशेष टंचाई नाही.

मे आणि जून महिन्यामध्ये शाळा व महाविद्यालय बंद असतात खून सुद्धा असते यामुळे या महिन्यांमध्ये सर्वसाधारणपणे रक्ताची टंचाई आढळते. सध्या करोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळ यामुळे देशभरात लोक डाऊन असले तरीसुद्धा एरवी या कालखंडामध्ये बरेच नोकरदार सुट्टी घेऊन पर्यटनासाठी सुद्धा जातात. त्यामुळे रक्तदान करताना किंवा त्यासाठी शिबिरांचे आयोजन करताना नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे गरजेचे आहे.

याबाबत बोलताना एका दुसऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की रक्ताचा अतिरिक्त साठा करून ठेवणे हे हिताचे नाही. सध्या फक्त गरजेच्या सर्जरी रुग्णालयांमध्ये केल्या जात आहेत आणि आणि डॉक्टरांकडे येणाऱ्या रूटीन पेशंटची संख्या सुद्धा कमी झाल्यामुळे रक्ताची गरज सुद्धा त्याच प्रमाणात घटली आहे.

सध्या रक्ताची गरज फक्त इमर्जन्सी केसेस आणि थॅलेसेमिया किंवा हिमोफिलिया रुग्णांना लागत आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्त हे साधारणपणे ३५ दिवस साठवून ठेवता येते. त्यामुळे रक्तदान शिबिर घेताना ह्याच प्रमाणामध्ये रक्त दान करावं. अर्थाचे शिबिरांमध्ये सुद्धा
सोशल डिस्टन्सिंग पाळणे व एका वेळेला एकाच पेशंटचे रक्त घेणे चेहऱ्यावर मास्क करणे यासारख्या उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

“सध्या रक्ताची प्रचंड अशी टंचाई नाही त्यामुळे आम्ही सर्व रक्तदात्यांना आणि शिबिर आयोजकांना अशी विनंती करत आहोत की त्यांनी एकाच वेळेला मोठी रक्तदान शिबिरं घेण्यापेक्षा येत्या काही महिन्यांमध्ये गॅप ठेवून रक्तदान शिबिरे घ्यावीत जेणेकरून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरवठा सुरळीत राहील,” असे या अधिकाऱ्यांनी आवर्जून सांगितले.

महाराष्ट्रामध्ये साधारणपणे ३४१ रक्तपेढ्या असून दरवर्षी साधारणपणे १ लाख ३० हजार ते  १ लाख ५० हजार  इतक्या रक्षकांच्या पिशव्यांची गरज रुग्णांना असते.