News Flash

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमागे ‘हे’ आहे कारण

भाजपा महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली माहिती

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीमागचे तर्कवितर्क आणि आडाखे लावले असतानाच या भेटीमागे काय कारण होतं ते समोर आलं आहे. महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली.

काय म्हणाले आहेत केशव उपाध्ये?
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेत संजय राऊत यांची भेट झाली आहे. जय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 7:39 pm

Web Title: this is the reason behind devendra fadanvis and sanjay raut meet says bjp spoke person keshav upadhye scj 81
Next Stories
1 मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची मुंबईत भेट
2 भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झाल्यानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
3 “सतत पवारांसोबत राहून राऊतांनाही कोलांट्या मारण्याची सवय झाली”
Just Now!
X