28 September 2020

News Flash

मंत्रीमंडळातून यांना मिळाला डच्चू

आज नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडला

(मुख्यमंत्री आणि राज्यपाल मंत्र्यांना शपथ देताना)

देवेंद्र फडवणीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार रविवारी सकाळी पार पडला. यामध्ये १३ नव्या सदस्यांचा समावेश करण्यात आला. सकाळी ११ वाजाता राज्यपालांनी नवीन सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुंबईमधील मलबार हिल येथील राजभवन येथे नव्य मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.

नवीन सदस्यांना मंत्रीमंडळात स्थान देताना सहा सदस्यांना डच्चू देण्यात आला आहे. राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरिष अत्राम यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असून मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. कारण ते शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांसोबत अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी गेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या फडणवीस सरकारच्या या अखेरच्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

कोणाकडे होतं कोणतं मंत्रीपद –

कॅबिनेट
प्रकाश मेहता ( गृहनिर्माणमंत्री)
विष्णू सवरा : (आदिवासी विकास मंत्री )
राजकुमार बडोले (सामाजिक न्याय मंत्री )

राज्यमंत्री –
प्रवीण पोटे पाटील (पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम )
अंबरिश अत्राम (आदिवासी विकास)
दिलीप कांबळे (सामाजिक न्याय)

नव्या मंत्रीमंडळतात भाजपाला दहा, शिवसेना दोन आणि आरपीआयला एक मंत्रीपद दिले आहे. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रीपद नाकारल्यामुळे त्यांना दोन मंत्रीपदे देण्यात आली आहेत.

यांनी घेतली पद आणि गोपनियतेची शपथ –

कॅबिनेट मंत्री
– राधाकृष्ण विखे पाटील
– जयदत्त शिरसागर
– डॉ. आशिष शेलार
– डॉ. संजय कुटे
– सुरेश दगडू खाडे
– डॉ. अनिल बोंडे
– डॉ. अशोक उईके
– तानाजी जयवंत सावंत

राज्यमंत्री
– योगेश सागर
– अविनाश माहतेकर
– संजय भेगडे
– परिणय फुके
– अतुल सावे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2019 1:24 pm

Web Title: this six minister resigned nck 90
Next Stories
1 नुसत्या नोकर्‍यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील प्रतिभा ओळखा : राज ठाकरे
2 ‘हीच पत्नी जन्मोजन्मी मिळो’, पुण्यात वटवृक्षाला महिलांनी नव्हे तर पुरुषांनी मारल्या फेऱ्या
3 विखे, शेलार, क्षीरसागर यांच्यासह १३ जणांनी घेतली शपथ
Just Now!
X