राज्यातील दिवसेंदिवस करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पूर्ण लॉकडाउनचा इशारा दिलेला आहे. तसेच, कठोर नियम जारी करणार असल्याचं देखील सांगितलं आहे. यानंतर मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या प्रमुख शहरांमधून स्थलांतरित मजूर आपल्या गावी परतत असल्याचे दिसून लागेले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे.
“महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या रेल्वेंच्या प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढू लागली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याहून मोठ्याप्रमाणावर स्थलांतरित कामगार निघून जात असल्याच्या बातम्या येत आहेत. हा लॉकडाउनच्या इशाऱ्याचा परिणाम आहे. यामुळे करोना थांबेल अथवा न थांबेल, मुंबईतील आर्थिक घडामोडी नक्कीच थांबतील.” असा इशारा संजय निरूपम यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
महाराष्ट्र से बाहर जानेवाली ट्रेनों के प्लेटफ़ॉर्म पर भीड़ बढ़ने लगी है।
मुंबई, ठाणे और पुणे से माइग्रेंट मजदूरों के तेज़ी से पलायन की खबर आ रही है।
यह #लॉकडाउन की चेतावनियों का नतीजा है।
इससे #कोरोना थमे या न थमे, मुंबई की आर्थिक गतिविधियाँ जरूर थम जाएँगी।#COVIDSecondWave— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) April 4, 2021
या अगोदर देखील लॉकडाउनच्या मुद्यावरून संजय निरूपम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.“लाईव्हमधून करोनाला पराभूत करण्याची निश्चित योजना देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची धमकी दिली आहे”, असं संजय निरूपम म्हणाले होते. त्यांनी लॉकडाउनला वेळोवेली विरोध दर्शवलेला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हवर टीका करताना ते भितीदायक असल्याचं संजय निरुपम आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेलं आहे. “कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेला पराभूत करण्यासाठी आणि बेड वाढवण्यासारख्या वैद्यकीय सुविधा तातडीने सुधारण्यासाठी एक निश्चित योजना देण्याऐवजी माननीय मुख्यमंत्र्यांनी फक्त लॉकडाऊन लागू करण्याची अजून एक धमकी दिली. हे भितीदायक आहे”, असं ट्वीटमध्ये संजय निरुपम म्हणाले होते.
Lockdown : “मुख्यमंत्र्यांची पुन्हा धमकी”, लॉकडाऊनवरून संजय निरुपम यांचा निशाणा!
तर, शनिवारी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांसह विविध क्षेत्रातील संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत लॉकडाउनसंदर्भातील निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. लॉकडाउन करायचा की कडक निर्बंध लावायचे यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2021 3:31 pm