25 October 2020

News Flash

यंदा रायगडावर साधेपणाने साजरा होणार शिवराज्याभिषेक सोहळा – युवराज संभाजीराजे छत्रपती

करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

संग्रहित छायाचित्र

दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात, जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. यंदा मात्र करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

“करोना महामारीचे संकट पाहता समाजहीत डोळ्यासमोर ठेवून शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे नियोजन केले आहे. सोहळा साधेपणाने साजरा होईल” असे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्यावतीने दरवर्षी ६ जूनला दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात. समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शिवभक्तांच्या सहकार्याने २००८ साली मेघडंबरीत शिवछत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना झाली.

शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशाच्या काना-कोपऱ्यातून शिवप्रेमी मोठया संख्येने रायगडावर येतात. परदेशी पाहुणे सुद्धा यामध्ये असतात. रायगडावर यावेळी वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. पण यंदा मात्र करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने हा सोहळा साजरा होणार आहे.

असा करावा सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याला लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यावर्षीचा शिवराज्याभिषेक घरात राहूनच विविध उपक्रमांनी साजरा करावा. स्वराज्याचे प्रतिक भगवा ध्वज घरासमोर लावावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे, झाड लावून संगोपन करावे, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 6:50 pm

Web Title: this year simply shivrajyabhishek sohala celebrate at raigad dmp 82
Next Stories
1 करोना रोखण्यासाठी उस्मानाबादमध्ये ‘एक गाव एक पोलीस कर्मचारी’ पॅटर्न
2 आठ जूनपासून खासगी ऑफिसेस उघडणार पण…
3 रेड झोनमधील दुकाने उघडणार, टॅक्सी, रिक्षाही धावणार….
Just Now!
X