आगामी वर्षांत पूर्वार्धात पाऊसमान बऱ्यापकी असले तरी, उत्तरार्धात मात्र पाऊस दगा देण्याची भीती मिरजेतील वार्षिक पंचांग कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली आहे. दुष्काळाने त्राहि भगवान करून सोडणारा पाऊस येत्या वर्षीही अनिश्चित असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा धुंडाळायला लावणार आहे.
सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे आज (गुरुवारी) सायंकाळी  आगामी वर्षांतील पर्जन्यमान सांगणाऱ्या सामूहिक पंचांग वाचनाचा कार्यक्रम पार पडला. दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांमध्ये पंचांगातील पावसाचा अंदाज ऐकण्यासाठी मोठी उत्सुकता दिसून आली.
खंडेराजुरी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोरील पार कट्टय़ावर सायंकाळी सामूहिक पंचांग वाचन करण्यात आले. प्रारंभी गावचे भटजी बाळू जोशी यांनी पोलीस पाटील तानाजी पाटील व मुलकी पाटील बाळासाहेब पाटील (भोसले) यांच्या हस्ते पंचांगाचे पूजन केले. पंचांग पूजनानंतर गुळखोबरे मिश्रित िलबपर्णाच्या ठेच्याचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर बाळू जोशी यांनी पंचांग वाचन केले. आगामी वर्षांत पूर्वार्धात पाऊसमान बऱ्यापकी असले तरी, उत्तरार्धात मात्र, पाऊस दगा देण्याची शक्यता वर्तविण्यात आली. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पाण्याचे दुíभक्ष्य जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
यंदाच्या पावसाचा निवास माळय़ाच्या घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे. चार अडक पाऊस म्हणजे पर्जन्यमान उत्तम आहे. चालू वर्षी ८ जून रोजी मृग नक्षत्रास सुरुवात होत असून त्याचे वाहन हत्ती आहे. हत्ती वाहन पर्जन्यसूचक असले तरी सजल नाडीत एकही ग्रह नाही. या नक्षत्राचा पाऊस बऱ्यापकी व सार्वत्रिक होईल, असा अंदाज पंचांगात व्यक्त करण्यात आला आहे. मात्र याचवेळी २ ऑगस्ट रोजी आश्लेषा नक्षत्र सुरू होत असून त्याचे वाहन उंदीर आहे. या नक्षत्राचे पर्जन्यमान अल्पप्रमाणात आहे. पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके कुचंबण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
लिंबाच्या पारकट्टय़ावरील सामूहिक पंचांग ऐकण्यासाठी मिरज पंचायत समितीचे उपसभापती आबासाहेब चव्हाण, सरपंच बापूसाहेब माणगावे,माजी उपसरपंच राजू सुंगारे, ग्राम पंचायत सदस्य बबन पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.