20 September 2020

News Flash

भ्रष्टाचार केला तेच चौकशी करत असल्याचे दिसत आहे – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर जि.प.मधील करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील भ्रष्टाचारबाबत उच्चस्तरीय समितीकडून चौकशीची केली मागणी

कोल्हापूर जिल्हा परिषदेत करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील भ्रष्टाचारबाबत जिल्हाधिकारी यांनी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहे. पण भ्रष्टाचार केला तेच चौकशी करत असल्याचे दिसत आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली. जिल्हा परिषदेच्या बाहेरील उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या सुरू असलेली करोना रुग्णांची वाढ पाहता आज(बुधवार) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे , देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी विभागीय आयुक्त सौरव राव , जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील करोना निवारणातील त्रुटींचे निवेदन दिले गेले. शिवाय, याकामी जिल्हा प्रशासनाला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ही मदत करण्यास भाजपा तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या संवादांमध्ये जिल्ह्यामध्ये आणखी एका कोविड केंद्राच्या निर्मितीबाबत चर्चा झाली पण अद्याप स्पष्टता नसल्याने खुलासा करावा. शहरात व जिल्ह्यात ब-याच रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. रुग्णांना रुग्णालयाच्या दारोदारी फिरावे लागत आहे. ही बाब गंभीर असून उपाययोजनाबाबत स्पष्टता आणावी. खासगी रुग्णालय सरकार मान्य दरापेक्षाही अजून जास्त कर आकारत असूनही कारवाई केली जात नाही. खासगी प्रयोगशाळेमध्ये सरकारमान्य दरापेक्षा अधिक दराची आकारणी होत असून, याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 6:40 pm

Web Title: those who committed corruption are seen investigating chandrakant patil msr 87
Next Stories
1 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या – चंद्रकांत पाटील
2 देशातील पहिले अशोकचक्र मराठवाड्याच्या मुक्तीसाठी!
3 MPSC : उमेदवारांना परीक्षा उपकेंद्रात करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन
Just Now!
X