News Flash

बोईसरमध्ये अफवांचे पीक

बिहारला रेल्वे जाणार असल्याच्या वृत्तामुळे हजारोंची गर्दी

बिहारला रेल्वे जाणार असल्याच्या वृत्तामुळे हजारोंची गर्दी;  पोलिसांना पाचारण

बोईसर : बिहारला जाणारी रेल्वे गाडी सोडणार अशी अफवा पसरल्यानंतर बिहार येथे जाण्यासाठी तेथील नागरिकांनी बोईसरच्या तारापूर विद्यामंदिर शाळेजवळ हजारोच्या संख्येने गर्दी केली. त्यामुळे या ठिकाणी सामाजिक अंतराचा फज्जा उडाला.  गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.

बोईसरमध्ये लाखोंच्या संख्येने परराज्यातील कामगार राहत आहेत.  राज्य शासनाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान येथे जाणाऱ्या रेल्वेगाडय़ा सोडल्यानंतर बिहार राज्यात जाण्यासाठी गाडी सोडण्यात येणार असल्याच्या अफवेने जोर धरला होता. ही अफवा समाजमाध्यमांवरून बोईसरमध्ये वाऱ्यासारखी पसरली.

अफवा गृहीत धरून नागरिकांनी हजारो संख्येने मंगळवारी तारापूर विद्यामंदिर शाळा येथे आरोग्य तपासणी होणार असल्याचे समजून जमा झाले. या ठिकाणी मोठी गर्दी जमून  सामाजिक माध्यमाचा फज्जा उडाला होता. ही घटना पोलिसांना समजताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बिहारला अशी कोणतीही गाडी जाणार नसल्याचे पोलिसांनी  समजावून सांगितल्यानंतर  गर्दी नियंत्रणात आली.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश  येथे जाण्यासाठी गाडी सोडल्यानंतर बिहारला जाण्यासाठी गाडी सोडावी अशी मागणी होत आहे. मात्र बिहार सरकारमार्फत मजुरांना येथून नेण्यासाठी अजूनही कोणतीच भूमिका स्पष्ट नसल्याने बिहारला गाडी सोडणे प्रशासनाला शक्य नसल्याचे समजते.

बिहार येथे जाण्यासाठी रेल्वेगाडी सोडण्यात येणार असल्याची अफवा पसरल्याने नागरिकांनी मोठी गर्दी जमा केली. मात्र त्यांना समजावून सांगून त्यांना तेथून जाण्यास सांगितले. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच गाडी सोडण्यासंदर्भात सूचना आल्यास नागरिकांना कळविण्यात येईल.

प्रदीप कसबे, पोलीस निरीक्षक,बोईसर पोलीस ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 1:46 am

Web Title: thousands of migrant workers gather in boisar after rumours of a train to patna zws 70
Next Stories
1 पालघरमध्ये ‘एक गाव, एक समूह गट, एक वाण’
2 शेतकऱ्याकडून रोगग्रस्त टोमॅटो रोपे तपासणीसाठी बंगळुरुला
3 सांगली भाजपमध्ये वाढती खदखद
Just Now!
X