पती-पत्नी एकत्रीकरणाचे सूत्र कागदावरच
शिक्षक दाम्पत्याला एकाच ठिकाणी नोकरीत ठेवण्याचे म्हणजेच पती-पत्नी एकत्रीकरणाचे धोरण शासनाने २००१ पासून ठरवले असले आणि आंतरजिल्हा बदलीने नेमणूक देण्याबाबत शासनाच्या ग्रामविकास विभागाने परिपत्रक २०११ मध्ये जारी केले असले तरी राज्यात सुमारे दहा हजारावर अशी शिक्षक दाम्पत्ये वर्षांनुवष्रे परस्परांपासून विभक्तावस्थेत असल्याचे अत्यंत क्लेशदायी चित्र आहे.
ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांसह वर्ग ३, वर्ग ४ च्या आंतरजिल्हा बदली करण्याबाबतची परिपत्रके २० मार्च, १ जून आणि २१ जून २००७ ला जारी केली. त्यात १९ सप्टेंबर २०११ च्या परिपत्रकाने दुरुस्त्या करून आंतरजिल्हा बदलीसाठी किमान १० वष्रे सेवा पूर्ण करण्याची अट शिथील करून ती ५ वष्रे करून अशी संधी त्यांच्या सेवाकालावधीत एकदाच दिली जाईल,
इच्छूक कर्मचाऱ्याने किंवा शिक्षकाने शैक्षणिक वर्षांच्या ३१ डिसेंबरच्या आत अर्ज केला पाहिजे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने ३० एप्रिलपर्यंत संबंधित शिक्षकाला कार्यमुक्त करावे. याचसाठी माजी सनिक प्रवर्गातून नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी सेवेची अट ५ ऐवजी किमान ३ वषार्ंची करण्यात आली आहे. अपंग, गंभीर आजारी, विधवा, परितक्त्या, अविवाहित, सनिक पत्नी, माजी सनिकांना आंतरजिल्हा बदल्यांना प्राधान्य देण्याचेही शासनाचे धोरण आहे. अशा सर्व तरतुदी असूनही गेल्या पाच वर्षांंपासून या शिक्षक दाम्पत्यांचे एकत्रीकरणासाठीचे अर्ज धूळखात पडल्याचा आरोप राज्य शिक्षक आंतरजिल्हा बदली कृती समितीने केला आहे.
पती-पत्नी एकत्रीकरणाची तरतूद केवळ कागदावरच आहे, त्यामुळे प्रत्यक्षात पती िहगोलीत, तर पत्नी यवतमाळात, पत्नी गडचिरोलीत, तर पती धुळ्यात, कुठे पती औरंगाबादला, तर पत्नी रत्नागिरीला, कुठे पती कोल्हापूरला, तर पत्नी नांदेडला, तर कुठे पती नंदूरबारला, तर पती यवतमाळला, असे अनेक दाम्पत्य एकमेकांपासून शेकडो किलोमीटर अंतरावर नोकरीला आहेत. ही बाब कृती समितीने एका निवेदनाव्दारे येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केली आहे. एकटय़ा यवतमाळ जिल्ह्य़ातील ५८ शिक्षकांच्या पत्नी पुणे, रत्नागिरी, परभणी, बीड, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, िहगोली, भंडारा, सोलापूर, नगर, नंदूरबार, अलीबाग, गडचिरोली, सिंधूदूर्ग, औरंगाबाद, नागपूरसारख्या ठिकाणी शिक्षिका आहेत.
आंतरजिल्हा बदली करून आमची पत्नी आमच्यासोबत ठेवून नसíगक न्यायाचे पालन करा, अशी मागणी कृती समितीचे राज्याध्यक्ष विनोद राठोड, उपाध्यक्ष जितेंद्र गवळी, सरचिटणीस दादाराव निळकंठे, राज्य सरसचिव प्रशांत पवार, महिला प्रमुख आम्रवृक्षाला घरे, रूपाली बावीस्कर, यवतमाळ जिल्हाध्यक्ष के.पी. डंभारे, उपाध्यक्ष एस.एस. केराम, साहेबराव पवार आणि जिल्हा सरचिटणीस एम.व्ही मुंडकर यांनी केली आहे.

.तर घटस्फोट आंदोलन
या एकत्रीकरण धोरणानुसार आंतरजिल्हा बदली करून शिक्षक दाम्पत्यांना नसíगक न्याय दिला नाही, तर ११ एप्रिलपासून आम्ही राज्यभर घटस्फोट आंदोलन करू, असा इशारा कृती समितीने सरकारला दिला आहे. या बदल्यांचे अधिकार सीईओंना आहेत. संच मान्यतेचा प्रलंबित विषय पुढे करून एकत्रीकरणाच्या मुद्याला बगल देत शिक्षक दाम्पत्यांवर अन्याय होत असल्याची व्यथा कृती समितीने गुरुवारी वार्ताहर परिषदेत व्यक्त केली. पत्नीला भेटायला यवतमाळहून रत्नागिरी, कोल्हापूर, धुळे, सोलापूर, अलीबाग, सांगली, सातारा आदी जिल्ह्य़ातील खेडय़ात शनिवारी जाऊन येतो म्हटले तरी बायकोचे फक्त तोंडच पाहून परतावे लागते, अशी व्यथा काही शिक्षकांनी येथे शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितली तेव्हा एका अधिकाऱ्याने ‘शासन का चुकले, हेच मला कळत नाही?’, असे म्हणत शिक्षकांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दोन धृवावर दोघे आपण.. अशी या दाम्पत्यांची गत आहे.