टोल विरोधी लढय़ात अग्रभागी असणारे कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांना रविवारी धमकी देणारे फोन भ्रमणध्वनीवर येत राहिले. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचे काम सुरू आहे.
निवास साळोखे आज सकाळी  नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी असताना सकाळी त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन आला. समोरील व्यक्ती िहदीमध्ये बोलत होती. त्याने निवास साळोखे यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. निवास साळोखे यांनी त्या व्यक्तीला तुम्ही कोण बोलताय? तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे? असे विचारले. यावरही त्याने शिवीगाळ करणे सुरू ठेवले. तसेच निवास साळोखे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर निवास साळोखे यांनी फोन ठेवला. यानंतर पुन्हा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याच नंबरवरून फोन आला. यावेळी त्यांच्या मुलाने फोन घेतला. यावेळीही ती व्यक्ती त्याच भाषेत बोलत होती. फोन ठेवल्यानंतर त्यांनी तातडीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयवंत मोहिते याना फोनवरून संपर्क केला. यानंतर कृती समितीचे बाबा पार्टे, संभाजी जगदाळे, किसन कल्याणकर, जयकुमार िशदे, अशोक पवार आदींसह कृती समितीच्या सदस्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत सोनकांबळे यांनी याबाबत सखोल चौकशीचे आश्वासन कृती समितीला दिले. तर कृती समितीने या विरोधात तोव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, धमकी आलेला फोन उत्तर प्रदेशमधून आला असल्याचे समजते.