News Flash

महिलेला बलात्काराची धमकी देऊन श्रीगोंद्यात दरोडा, दागिने लुटले

दरोडेखोरांनी महिलेला अत्याचार करण्याची धमकी देत दरोडा

(संग्रहित छायाचित्र)

श्रीगोंदे शहरानजीक असणाऱ्या एका वस्तीवर सात जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने बुधवारी (दि. १५) पहाटेच्या सुमारास महिलेला तलवारीने मारहाण करत अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाइल असा चार हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांनी महिलेला अत्याचार करण्याची धमकी देत हा दरोडा टाकला.

पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती घेतली.

दरम्यान, घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलीस या संशयित तरुणांचा शोध घेत असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर या गुन्ह्यचा अधिक उलगडा होणार आहे.

याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार या महिलेची श्रीगोंदे शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या वस्तीवर शेतजमीन आहे. या ठिकाणी छपराच्या घरात ती मुलींसह वास्तव्यास आहे. दोन मुली वडिलांकडे गेल्याने एका मुलीसह ती या ठिकाणी राहते.

आज (१५) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही महिला आणि तिची मुलगी घराच्या बाहेर झोपले असताना दरोडेखोरांनी तिच्या चेहऱ्यावर विजेरी लावत उठवले. त्याच दरम्यान तिच्या डाव्या हाताच्या अंगठय़ामधून रक्त निघू लागले. ती घाबरून उठली.

दरोडेखोरांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, बाजूला ठेवलेला मोबाइल हिसकावून घेतला. दरोडेखोरांनी तिच्याशी मराठी व हिंदी भाषेत संवाद साधला. त्याच दरम्यान या महिलेच्या घरातून आणखी पाच जण बाहेर आले. त्यांनी अत्याचार करण्याची धमकी देत या महिलेला आरडाओरडा करायचा नाही असे सांगितले. महिलेने विनवणी केल्यानंतर दरोडेखोरांनी तिथून काढता पाय घेतला. घाबरलेल्या अवस्थेत या महिलेने बाजूच्या लोकांची मदत घेत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जाऊन घडला प्रकार कथन केला.

दरम्यान, चार दिवसापूर्वी तीन तरुणांनी हरणाची शिकार करण्याकरिता या महिलेच्या शेतात वाघर लावली होती. त्या तरुणांना वाघर लावण्यास विरोध केल्याने त्या तिघा तरुणांनी त्या महिलेशी वाद घातला होता. याच तरुणांवर महिलेने संशय व्यक्त केला आहे.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान पोलीस पथकाने संशयितांची धरपकड सुरू केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 12:16 am

Web Title: threatened to rape a woman jewelry robbed abn 97
Next Stories
1 सातारा जिल्ह्यात नवे चार करोनाग्रस्त
2 कोण आहेत झारीतले शुक्राचार्य? प्रश्न विचारत पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका
3 मला माफ करा… मी हरलो.. : जितेंद्र आव्हाड
Just Now!
X