प्रेमी युगुलास मारहाण करताना त्याचे मोबाइलवर चित्रीकरण करून व्हॉट्सअपवर प्रदíशत करून युगुलाची बदनामी करणाऱ्या ‘गनिमी कावा’ संघटनेच्या सहा जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पकी तिघांना अटक करण्यात आली.
महाविद्यालयीन तरुण-तरुणी एकत्र येणे काही जणांना आवडत नाही. हा प्रकार संस्कृतीच्या विरोधात असल्याचे सांगत कायदा आपल्या ताब्यात घेत जरब बसवण्याचा या मंडळींचा खाक्या असतो. लातूरमध्ये दोन महिन्यांपूर्वी एका प्रेमी युगुलास लाथा-बुक्क्याने मारहाण करून त्याचे चित्रण व्हॉट्सअपवर टाकले गेले. गुरुवारी सायंकाळी ते एका दूरचित्रवाहिनीने ते प्रकाशित केले. प्रेमी युगुलास मारहाण करणारी ही चित्रफीत नेमकी कुठली? याचा तपास पोलिसांनी सुरू केला व अवघ्या दोन तासांत चक्र फिरले. लातूर जिल्हय़ातील हा प्रकार असल्याचे पोलिसांना लक्षात आले व रात्रीतून सहापकी तीन आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
गनिमी कावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष बालाजी गोडसे, अमोल खंदारे, राकेश गोडसे, नितीन गोडसे, संदीप गोडसे, अक्षय बनसोडे (सर्व साखरा, तालुका लातूर) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. संदीप गोडसे, अमोल खंदारे व नितीन गोडसे यांना पोलिसांनी अटक केली. बालाजी गोडसे, अक्षय बनसोडे व राकेश गोडसे हे तिघे फरारी आहेत. दरम्यान, या सहा जणांना गनिमी कावा संघटनेतून बडतर्फ केल्याचे प्रदेशाध्यक्ष प्रा. राजकुमार सूर्यवंशी यांनी कळवले आहे.
दहशत पसरवण्याचा प्रताप अंगलट!
गेल्या ३० नोव्हेंबरला लातूर-मुरूड रस्त्यावर साखरा पाटी ते अंकोली दरम्यान प्रेमी युगुलास सायंकाळच्या सुमारास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यातील मुलीला तिच्या पालकाच्या स्वाधीन करून संघटनेचे कार्यकत्रे निघून गेले. मात्र, व्हॉट्सअपमुळे या प्रकाराची चर्चा पसरली. आणखी किती युगुलांबाबत असे प्रकार घडले असावेत? याचा तपास पोलीस करीत आहेत.