News Flash

सीमा तपासणी नाक्यावरुन पैसे घेऊन प्रवेश, बीडमधील तीन पोलिस निलंबित

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू चा शिरकाव होऊ नये यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

कोरोना टाळेबंदीत जिल्हयाच्या बंद सिमेवरून पास नसताना प्रवेश दिल्याचा धक्कादायक प्रकार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनीच केलेल्या गुप्त तपासणीत उघड झाला. या प्रकरणी तीन पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू चा शिरकाव होऊ नये यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. मात्र प्रवेशाची पास नसताना पैसे घेऊन प्रवेश दिला जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या . या पार्श्वभूमीवर बीडचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी तपासणी नाक्यांवर बनावट प्रवासी पाठवून तपासणी केली.

शहागड -खामगाव तपासणी नाक्यावर डमी प्रवाशाला जिल्ह्यात येण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. तर महार टाकळी नाक्यावर शेवगाव कडे जाणाऱ्या इसमास कोणीही अडवले नाही, १५ मिनिटांनी तो परत येत असताना त्याची चौकशी केली नाही. दोन्ही प्रकारात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलीस कर्मचारी एम. के. बाहिरवाल ,डी . बी . गुरसाळे , एस. बी . उगले , यांना निलंबित करण्यात आले आहे. तर महार टाकळी नाक्यावरील पोलिसांना दंड करण्यात आला आहे. मातोरी आणि दौलावडगाव येथील नाक्यांवर मात्र कडेकोट व्यवस्था असून तपासणी शिवाय कोणाला येऊ दिले जात नसल्याचे समोर आले. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी बक्षीस दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 8:31 pm

Web Title: three beed police suspended nck 90
Next Stories
1 सात वर्षीय मुलाचा पाण्यात बुडुन मृत्यु
2 सोलापुरातील करोनाबाधितांची संख्या ४०० कडे, १५० जणांची करोनावर मात
3 चंद्रपूरच्या पॉझिटिव्ह युवतीच्या यवतमाळच्या नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह
Just Now!
X