रायगडमधील कोलाड या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या एका ग्रुपमधले तिघेजण कुंडलिका नदीत बुडाले. या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. रविवारी ही घटना घडली होती. रविवारी संध्याकाळी महेश जेजुरीकर (वय-३९), अक्षय गणगे (वय-२९ ) या दोघांचे मृतदेह रविवारी सापडले होते. मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते.

सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यानंतर परेश जेजुरीकर (वय-३५) यांचाही मृतदेह सापडला. नदीत पोहतना अक्षय गणगे बुडू लागला तेव्हा त्याला वाचवण्यासाठी महेश आणि परेश या दोघांनीही उडी घेतली होती. मात्र तिघांचाही या घटनेत मृत्यू झाला. कोलाड पोलिसांसह राफ्टिंग क्लबच्या सदस्यांनीही शोध कार्यात सहभाग घेतला होता. रविवारीच एक ग्रुप कोलाड या ठिकाणी पर्यटनासाठी आला होता तेव्हा ही घटना घडली होती. अखेर सोमवारी तिन्ही मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.