पुणे-बंगळुरू महामार्गावर बेलवडे ( ता. कराड) गावच्या हद्दीत शैक्षणिक सहलीहून परतणाऱ्या भरधाव खासगी बसची ऊस वाहतूक ट्रॉलीला जोराची धडम्क बसून अपघात झाला. या अपघातात महाविद्यालयीन तरुण,बस वाहक व शिपाई असे तीन जण ठार झाले. तर, सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातप्रकरणी तळबीड (ता.कराड) पोलिसात बस चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील गाडीला मागे टाकण्याच्या नादात बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बसने ट्रॉलीला धडम्क दिलीे. त्यात काष्टी (ता.श्रीगोंदा) येथील परिक्रमा इंजिनीअिरग कॉलेजचा विद्यार्थी अभिजित पंडित पेठकर (२२, रा.दौंडम्,जि.पुणे),बसचा वाहक आकाश बसवराज बिराजदार (१८) आणि महाविद्यालयाचा शिपाई सूर्यकांत सुदाम कानडे (२५) हे तिघे ठार झाले.तर,एक विद्याíथनी व पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. आष्टीच्या परिक्रमा इंजिनीअिरग कॉलेजच्या इलेक्ट्रोनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेचे सुमारे ४० विद्यार्थी कालिदा ट्रॅवल्सच्या खाजगी बसने गोव्याला सहलीसाठी गेले होते.