06 December 2020

News Flash

नगरजवळ अपघातात कुटुंबातील तिघे ठार

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील इमामपूर घाटात मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले

| September 7, 2013 01:57 am

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील इमामपूर घाटात मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले, तर तिघे जखमी झाले. हे सर्वजण औरंगाबादजवळील पढेगावचे आहेत. मृतांमध्ये सासू, सून व ४१ दिवसांच्या लहान बाळाचा समावेश आहे. एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सासू अन्सा फरजाना हमीद (वय ५६), डॉ. सनातजीन शहानवाजी हमीद (२४) व हंसीरअली शहानवाजी अली (वय ४१ दिवस) अशी मृतांची नावे आहेत. सासरा सय्यद हमीद इक्रम अली (वय ५७), नातलग सय्यद महमद अली हमीद अली (२८) व चालक सय्यद सलाम सलीम हे जखमी आहेत. डॉ. सनातजीन यांचा विवाह वर्षांपूर्वीच झाला होता. हमीद कुटुंबीय टोयाटो जीपने (एमएच २० बीवाय ६०८३) औरंगाबादहून पुणे येथे जात होते व तेथून पुढे विमानाने बंगळुरूला जाणार होते. टोयाटोची व खासगी प्रवासी कंपनीच्या लक्झरी बसची (एमएच २७ ए ९६०७) समोरासमोर धडक झाली. लक्झरी बस पुण्याहून यवतमाळकडे चालली होती. बसच्या चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 1:57 am

Web Title: three died of a family at nagar misshape
Next Stories
1 विकलेल्या २६ सहकारी साखर कारखान्यांचे काय?
2 शेतकऱ्यांना चुचकारण्यासाठी शरद पवारांच्या विदर्भ दौऱ्याची खेळी
3 जादूटोण्याला लगाम: नाशिकमध्ये नरबळीच्या प्रयत्नातील दोघांना अटक
Just Now!
X