13 August 2020

News Flash

‘होम क्वारंटाइन’ असताना बाहेर फिरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

तिघेही परदेशातून भारतात आले होते.

संग्रहित छायाचित्र

घरात राहण्याचे आदेश असूनही बाहेर फिरणाऱ्या तिघांवर रायगड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हे तिघेही परदेशातून भारतात आले होते.

श्रीवर्धन तालुक्यातील खारशेत भावे येथील होम क्वारंटाइनचे शिक्के असणाऱ्या तीन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. क्वारंटाइनचे शिक्के असणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्य़ातील पहिलीच घटना आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या देशांतून परतणाऱ्या नागरिकांना निगराणी कक्षात आणि होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येत आहे. तसेच होम क्वारंटाइन असणाऱ्या व्यक्तींना शिक्के मारण्यात येत असून त्यांनी घरातून बाहेर फिरण्यास बंदी केलेली आहे. असे असताना श्रीवर्धन तालुक्यातील खारशेत भावे येथील सैबुल्ला हसन दर्जी (दुबई), सलमान सैबुल्ला दर्जी (सौदी) व अहमद करीम दळवी (दुबई) हे नुकतेच परदेशातून परतले होते. सध्या त्यांच्यात कोणत्याही प्रकारची कोरोना व्हायरसची लक्षणे दिसली नसली तरी ते घराबाहेर फिरत होते. त्यामुळे या तिघांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन प्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी कलम १८८ व २६९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:59 am

Web Title: three home quarantine who turned out were charged with crimes abn 97
Next Stories
1 करोनाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेला बळी पडू नये
2 साताऱ्यात आणखी ८ जणांचे नमुने तपासणीसाठी
3 शेतमालाच्या लिलावात पुरवठय़ातील अडचणींचा अडसर
Just Now!
X