News Flash

नवेगाव नागझिरा आग : मृत वनमजूरांच्या वारसांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

जखमींच्या उपचाराचा खर्चही राज्य सरकार करणार

(संग्रहित छायाचित्र)

गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात, नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात काल(दि.८) अज्ञात इसमाने लावलेली आग विझवताना तीन हंगामी वनमजूरांचा मृत्यू झाला असून दोन वनमजूर जखमी झाले आहेत. मृत मजूरांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवाय आगीत जखमी वनमजूरांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वनात आग लागल्याचे दिसताच जवळपास ५० ते ६० वनकर्मचारी, अधिकारी आणि हंगामी मजूर ती विझवण्याचे काम करत होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यातही आली परंतू वाऱ्याने पुन्हा अंगार पेटला आणि अचानक आगीने वेढल्याने व पहाडी जागा असल्याने वन वणवा विझवणाऱ्या तीन हंगामी वनमजूरांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या वनमजूरांमध्ये राकेश युवराज मडावी (वय ४०), रेखचंद गोपीचंद राणे (वय ४५) , सचिन अशोक श्रीरंगे (वय २७) या हंगामी वनमजूरांचा समावेश आहे. तर, विजय तीजाब मरस्कोले (वय ४०) आणि राजू शामराव सयाम (वय ३०) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अज्ञान इसमाने लावलेल्या आगीप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 2:00 pm

Web Title: three labourers killed in navegaon nagzira tiger reserve forest fire in maharashtras gondia sas 89
Next Stories
1 कुटुंब नियोजन केलं असतं तर लसींचा साठा कमी पडला नसता – उदयनराजे
2 “…तर महाराष्ट्र आपला सदैव ऋणी राहील!”, टोला मारत रोहित पवारांची भाजपाला विनंती
3 “सध्या मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना एकच काम दिलंय…!” भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा सरकारवर निशाणा!
Just Now!
X