05 August 2020

News Flash

महाराष्ट्रातील ३ पर्यटकांचा पश्चिम बंगालमध्ये अपघाती मृत्यू

पर्यटक खासगी बसने गंगासागरहून लातूरच्या दिशेने निघाले असताना घडला अपघात

| June 15, 2016 01:34 pm

पश्चिम बंगालमधील बुरद्वान जिल्ह्यात बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात राज्यातील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. पश्चिम बंगालमध्ये फिरण्यासाठी लातूरमधून गेलेल्या पर्यटकांची बस फागूपूरमध्ये एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. जवळपास गेला महिनाभर हे पर्यंटक पश्चिम बंगालमध्ये फिरत आहेत. संजय दाखण (४२), राजमती बाळशेट्टी (६५) आणि अजय अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
सर्व पर्यटक खासगी बसने गंगासागरहून लातूरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी त्यांची बस एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी बस आणि ट्रक ताब्यात घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2016 1:34 pm

Web Title: three maharashtra pilgrims killed in wb bus crash
Next Stories
1 ‘उडता पंजाब’वरून पंजाबमधील स्वयंसेवी संस्था सुप्रीम कोर्टात
2 दिघ्यातील बेकायदा इमारतींच्या पाडकामाला तात्पुरती स्थगिती
3 Facebook launches suicide prevention tools:आत्महत्या रोखण्यासाठी फेसबुकचे नवे टूल!
Just Now!
X