महागाव येथील करोनाबाधित मृतकाच्या निकटच्या संपर्कात आलेल्या तीन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. यातील एकाचा अहवाल मंगळवारी रात्री तर दोघांचे अहवाल आज बुधवारी पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, एका करोनाबाधित रूग्णाला आज बुधवारी सुट्टी झाल्यामुळे विलगीकरण कक्षात सध्या ३४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णांसह एकूण ४३ जण भरती आहेत.

जिल्ह्यात नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना महागावच्या कोविड केअर सेंटरमधून यवतमाळ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३४ झाली आहे. जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १६० झाली असून, आतापर्यंत १२३ जण सुट्टी होऊन घरी परतले आहेत, तर जिल्ह्यात  दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा- औरंगाबादकरांची चिंता वाढली, १२१ नवे करोना पॉझिटिव्ह ; एकूण संख्या २ हजार २७१ वर

दरम्यान महागावसह दिग्रस येथील ११८ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनासा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत २ हजार ३९८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.