News Flash

सोलापुरात करोनाचे आणखी तीन बळी; नऊ नव्या रूग्णांची भर

तीन मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश

सोलापुरात आज सकाळी आठ वाजता हाती आलेल्या माहितीनुसार नव्या नऊ करोनाबाधित रूग्णांची भर पडली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या ८६० वर गेली असून मृतांचा आकडा ७८ वर पोहोचला आहे.

आज सकाळी ५४ चाचणी अहवाल प्राप्त झाले असता त्यात पाच पुरूष व चार महिला करोनाबाधित आढळून आले आहेत. तीन मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. अलिकडे करोनाबाधित रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण झाल्याचे दिसून येते. जिल्हा कारागृहात एकाचवेळी ३४ कैद्यांना करोनाची बाधा झाल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तथापि, आतापर्यंत ३५१ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 9:17 am

Web Title: three more victims of corona in solapur addition of nine new patients aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वर्धा : महिला काँग्रेसच्यावतीने स्थलांतरित महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप
2 “..तर मी जीव देऊन तुम्हाला अडचणीत आणेन”; रावसाहेब दानवेंना जावयाची धमकी
3 धक्कादायक! सोलापुरातील कारागृहात ३४ कैद्यांना करोनाची लागण
Just Now!
X