News Flash

चंद्रपूर : काँग्रेस नेत्यांसह शहरातील १७ प्रतिष्ठीतांच्या वाहनाची तोडफोड

या प्रकरणी ३ जणांना अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

कॉग्रेस नेत्यांसह शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी व नागरिक अशा १७ जणांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड करून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मदन वाघाडे, अमित गावंडे व रोशन बावणे अशी या तिघांची नावे आहेत. यातील दोघे रेती तस्करीत सक्रीय आहेत.

सिव्हील लाईन वॉर्डात मध्यरात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत काही गावगुंडांनी धुमाकूळ घातला होता. तेव्हा या गावगुंडांनी कॉग्रेस नेते, व्यापारी व उद्योजक अशा एकूण १७ जणांच्या चारचाकींची तसंच ट्रॅव्हल्स कंपनीच्या वाहनांची तोडफोड केली होती. गाड्यांचे मागील आणि समोरील काच फोडण्यासोबतच तेथील महागड्या वस्तूही चोरल्याचा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे सर्वत्र भीती आणि दहशतीचे वातावरण परसले होते.

या प्रकरणाची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलीसांनी या दहशत पसरविणाऱ्या गावगुंडांचा मागोवा घेत स्नेह नगर येथील अमित गावंडे, वडगाव येथील मदन वाघाडे आणि बोर्डा येथील रोशन बावणे या तिघांना अटक केली. या तिघांनाही आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता जामिनावर सुटका झाली. विशेष म्हणजे या तिघांपैकी दोन जण रेती तस्करीत सक्रीय आहेत. या तीन गावगुंडांनी घातलेल्या गोंधळामुळे शहरातील १७ जणांच्या वाहनांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 7:04 pm

Web Title: three people arrested vehicle vandalism maharashtra chandrapur jud 87
Next Stories
1 गडचिंचले प्रकरण : CBI मार्फत चौकशी करा; प्रविण दरेकर यांची मागणी
2 शहापूरमध्ये ५ जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह; एकूण संख्या १६ वर
3 राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्या लोकांसाठी सोमवारपासून मोफत एसटी सेवा
Just Now!
X