देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान नाशिकच्या सप्तश्रृंगगडाला आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वणी या ठिकाणच्या सप्तशृंगी निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या नावांनी देखील ओळखले जाते. शुंभनिशुंभ व महिषासुर या असुरी शक्तींचा नाश केल्यावर तपसाधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केल्याची अख्याय़िका आहे. सह्याद्रीच्या या ४८०० फूट उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले असून, हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सुमारे पाचशे पायर्‍या, देऊळ, सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम देवस्थानच्यावतीने येथे नव्याने करण्यात आले आहे. सप्तश्रृंगी देवीची मूर्ती अठरा हातांची अतिभव्य असून, अत्यंत चैतन्यमयी आहे. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते. सप्तश्रृंगी गडावर नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात देवीची यात्रा भरते.
जगदंबेची ५१ शक्तीपीठे पृथ्वीवर असल्याचे पुराणांमध्ये सांगितले आहे. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगगडावरील सप्तशृंगी देवी होय. सप्तशृंगीचे पुराणकाळापासून माहात्म्य सांगितले जाते.
सप्तशृंगीदेवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा इ. महत्त्वाची पवित्र तीर्थस्थळे आहेत. सप्तशृंगगडावर अनेक उत्सव होतात. गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकूळ अष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असतात.
नाशिकपासून सुमारे ६५ कि.मी. अंतरावर कळवण तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिम रांगेत सप्तशृंगगडावर ही देवी वसलेली आहे. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातूनदेखील या देवीच्या दर्शनासाठी लोक येतात. मुंबईमधून रेल्वेने अथवा बसने नाशिकला व तेथून बसने दिंडोरी मार्गे वणीला जाता येते. सप्तश्रृंगी गडापासून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक (७० किमी) नाशिक येथे आहे. मुंबईहून रेल्वेने नाशिकला व नंतर बसने सप्तश्रृंगगडावर जाता येते. पुण्याहून राज्य परिवहन मंडळाच्या बसले थेट सप्तश्रृंगी दर्शनासाठी जाता येते.

Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा
jejuri marathi news, two lakh pilgrims jejuri marathi news
जेजुरीच्या सोमवती यात्रेस दोन लाख भाविक, शालेय परीक्षा व पाडवा सणाचा यात्रेवर परिणाम
dharashiv, tulja bhavani
तुळजाभवानी देवीचे दागिने चोरणारे फरारच! प्रमुख तीन संशयितांची नार्को टेस्ट करा : गंगणे
Rangpanchami was celebrated in Tuljabhavani temple in a devotional atmosphere
जगदंबेच्या मंदिरात सप्तरंगाची उधळण, भक्तीमय वातावरणात तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी साजरी