News Flash

यवतमाळमध्ये कुलरचा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू

राळेगाव तालुक्यातील घटना

प्रतिनिधिक छायाचित्र

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील कोदुर्ली येथे कुलरचा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (गुरुवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

रिया (९), संचिता (७) आणि मोनीता गजानन भूस्सेवार (५) अशी या मृत बहिणींची नावे आहेत. या दुर्घटनेत तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या तिघींचे आई, वडील दोघेही शेतात गेले होते. घरी तिघी बहिणीच होत्या. त्या जेवणाकरिता एकत्र बसल्या. तेव्हा रिया कुलर लावण्याकरिता गेली असता तिला कुलरमधून विजेचा जबर धक्का बसला. दरम्यान, तिला वाचविण्याकरिता संचिता व मोनीता पुढे सरसावल्या. त्यांनाही विजेच्या जबर धक्का बसला. या घटनेत तिघींचाही जागीच करुण अंत झाला. ही बाब घराशेजारच्या एका आजीबाईंना लक्षात आली. त्यांनी आरडाओरड करताच शेजारी घटनास्थळी धावून आले. पुढ्यात जेवणाचे ताट वाढून असताना कुलरसमोर तिन्ही चिमुकल्या बहिणींचे मृतदेह पडून होते. हे दृश्य बघून गावकरी हेलावून गेले.

राळेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतले व पंचनामा करिता रवाना केले. पोलीस अधिक तपास करीत आहे. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 1:55 pm

Web Title: three small sisters die of electric shock of water cooler in yavatmal aau 85
Next Stories
1 करोना चाचणीसाठी आलेल्या तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला स्वॅब, अमरावतीमधील संतापजनक प्रकार
2 “महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात? याचा आधी शोध घ्या”
3 Maharashtra SSC results 2020 : २४२ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी
Just Now!
X